*CATEGORY:* कोकण / चिपळूण / गणेशोत्सव
* *चिपळूण तालुक्यातील पेढांबे गावी गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; सामूहिक आरतीने डोळे पाणावले*
* *पेढांबे गावचा भावनिक निरोप सोहळा*
* सुचेता मोरे
*चिपळूण / प्रतिनिधी*
चिपळूण तालुक्यातील *पेढांबे गावी* गौरी-गणपतींना निरोप देण्याचा सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
गावातील सर्वजण गौरी-गणपती घेऊन एकाच वेळी नदीकडे मार्गस्थ झाले. हा एक आगळावेगळा आणि एकोप्याचा सोहळा ठरला.
नदीकाठी बांधलेल्या मोठ्या छपराखाली सर्व गौरी-गणपतींच्या मूर्ती ठेवून सामूहिक आरती करण्यात आली. या वेळी संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘गौरी माता की जय’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
सामूहिक आरतीनंतर शिस्तीने एकेका गणपतीचे नदीच्या डोहात भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले.
पेढांबे गावातील हा एकोपा आणि शिस्तबद्ध विसर्जन सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श ठरत आहे.
*- सुचेता मोरे, MAI MEDIA 24, चिपळूण*
*TAGS:* #SuchetaMore #Chiplun #Pedhambe #GauriGanpatiVisarjan #Kokan
*





















