- ठाणे लोकसभेचे खासदार *नरेश म्हस्के* यांचे तुर्भे येथील ₹२१००-२१९२ कोटींच्या प्रस्तावित एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन [ISWM / Waste-to-Energy] प्रकल्पावर गंभीर आक्षेप
*आक्षेप काय आहेत:*
– CPCB नियम, बफर झोन, पर्यावरणीय परवानग्या, जनसुनावणी झाली नाही
– DPR आणि PPP / टेंडर प्रक्रियेत अनियमितता
– स्थानिकांचा आरोप – १५ वर्षांपासून डम्पिंगमुळे TB, दमा, दुर्गंधी, आता कचरा जाळल्याने कॅन्सरचा धोका, २ लाख लोकवस्ती आणि औद्योगिक पट्ट्यामध्ये प्रकल्प नको 633f
*आत्ता काय घडतंय:*
खासदारांनी राज्य सरकारकडे प्रकल्प तात्काळ स्थगित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. याआधी शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी, अनिकेत म्हात्रे यांनीही कामाला स्थगिती देऊन दुसऱ्या जागी हलवण्याची मागणी केली होती आणि कचरा गाड्या अडवण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे या प्रकल्पाला `स्टे` मिळण्याची शक्यता वाढली आहे आणि महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
*





















