Home मुंबई *’पादचारी प्रथम’अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा परिसरातील १५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई*

*’पादचारी प्रथम’अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा परिसरातील १५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई*

19
0

*’पादचारी प्रथम’अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा परिसरातील १५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई*

*पादचाऱ्यांसाठी मोकळा व सलग पदपथ उपलब्ध*

‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा परिसरातील १५ अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. यात मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील पदपथावर अडथळा ठरणारी १३ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दोन असे एकूण १५ अनधिकृत स्टॉल्स निष्कासित करण्यात आले. तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील २७ स्टॉल्सधारकांना देण्यात आलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापलेली आढळली. अशा सर्व २७ स्टॉल्सधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व) नायर रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावरील पदपथावर असलेल्या २१ झाडांभोवतीच्या मातीच्या आळ्यांच्या (Tree Basins) दुरुस्ती करण्यात आली. तसेच काही झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली.

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बृहन्मुंबईमध्ये पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला बळ देण्यासाठी बृहन्मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे.

उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, सहायक आयुक्त श्री. आनंद कंकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या अभियानांतर्गत भायखळा परिसरातील डॉ. आनंद राव नायर मार्गावरील नायर रुग्णालयाजवळील सुमारे २६० मीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा व दुरुस्ती करण्यात आली. या पदपथांची सरासरी रुंदी ३.७५ मीटर असून, त्यापैकी सरासरी २.१५ मीटर रुंदीचा भाग पादचाऱ्यांच्या मुक्त व सलग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परिसरातील १३ अनधिकृत स्टॉल्स निष्कासित करण्यात आले आहेत.

नायर रुग्णालय परिसर असल्याने या पदपथाचा वापर मोठ्या प्रमाणात रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी तसेच इतर नागरिकांकडून केला जातो.

अनधिकृत स्टॉल्स व इतर अडथळे दूर करून पादचाऱ्यांसाठी अधिक मोकळी आणि सलग जागा उपलब्ध झाल्याने या मार्गावरील पादचारी वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत झाली आहे.

तसेच भायखळा पूर्व रेल्वे स्थानकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालय व वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील अंदाजे ४३५ मीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा व दुरुस्ती करण्यात आली आहे. या पदपथाची सरासरी रुंदी ३.२५ मीटर असून, सरासरी १.५० मीटर रुंदीचा चालण्यायोग्य भाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले २ अनधिकृत स्टॉल्स निष्कासित करण्यात आले आहेत.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here