Home मुंबई गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट — सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा...

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट — सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा ठरेल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

24
0

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट — सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा ठरेल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

मुंबईत रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा — शिंदेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी*

मुंबई, दि. ३: सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. सक्षम संपर्क व्यवस्था ही विकासाची गुरुकिल्ली असून, या रेल्वे सेवेमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्र. १८ वर मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे, महापौर रितू तावडे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, “गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सुरू झालेली सावंतवाडी एक्स्प्रेस ही कोकणवासीयांसाठी मोठी भेट आहे. कोकणाला निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळांचा वारसा लाभला आहे. या रेल्वेमुळे स्थानिक पर्यटन, हॉटेल उद्योग, वाहतूक आणि रोजगाराला चालना मिळेल.”

*रेल्वे जागेवरील पुनर्वसन —*
मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणे हटवताना तेथील नागरिकांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी शिंदे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली.

*केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले:*
“मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी १८ हजार कोटींची कामे सुरू आहेत. सध्या ३,२०० लोकल फेऱ्या — २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढवणार. यंदा ३५० विशेष गाड्या — गरज पडल्यास आणखी २० गाड्या. प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे — २३८ AC लोकल रेक निर्मितीचे आदेश — पहिली गाडी २०२७ मध्ये.”

जोगेश्वरी ५ फलाट, दादर १ फलाट, वसई रोड ६ फलाट, LTT ४ फलाट यांची कामे सुरू.

*पीयूष गोयल म्हणाले:*
“सावंतवाडी एक्स्प्रेस ही केवळ दोन टर्मिनलना जोडणारी नसून लाखो कुटुंबांची मने जोडणारी सेवा ठरेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला सुरक्षित, वेगवान प्रवास मिळेल.”

*सावंतवाडी एक्स्प्रेस विषयी:*
गाडी क्र. ०१००१ CSMT ते सावंतवाडी रोड — दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ थांबे. कोच: 1 AC प्रथम, 2 AC द्वितीय, 3 AC तृतीय, 4 स्लीपर, 4 जनरल.


*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here