https://x.com/VijayWadettiwar/status/2095356118621098495
विदर्भात पावसाची तूट; बळीराजाची चिंता वाढली!
-विजय वडेट्टीवार
अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस!
ऑगस्ट महिन्यात विदर्भावर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. विदर्भात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ५८ टक्के कमी पाऊस झाला असून, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतही सरासरीपेक्षा २२ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि वाशिमसह पश्चिम विदर्भातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. पावसाची कमतरता, सिंचनाचा अभाव आणि सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
एकीकडे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे सरकार मात्र या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही.
बळीराजाला केवळ आश्वासन नको, तर तातडीची मदत हवी!
पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई, पीकविमा आणि आवश्यक कृषी मदत सरकारने त्वरित जाहीर करावी.
शेतकरी संकटात असताना सरकारने आता तरी जागे व्हावे!
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@bharanemamaNCP
#FarmerCrisis #Vidarbha #FarmersRights #MaharashtraFarmers






















