Home दिल्ली देशाला वचनपुर्ततेसोबतच चेतना देणारा अर्थसंकल्प- डॉ. नीलम गोऱ्हे

देशाला वचनपुर्ततेसोबतच चेतना देणारा अर्थसंकल्प- डॉ. नीलम गोऱ्हे

192
0

*देशाला वचनपुर्ततेसोबतच चेतना देणारा अर्थसंकल्प- डॉ. नीलम गोऱ्हे*

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार भारताच्या अर्थमंत्र्यांची जवाबदारी पूर्ण करत असताना निर्मला सीतारामण यांनी आज २०२४ चां भारताचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे.

पायाभूत सुविधा, सुरक्षितता, तीर्थक्षेत्र पर्यटनातून आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण यांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे.

युवकांसाठी रोजगार प्रशिक्षण आणि कौशल्य शिक्षण असे अनेक महत्वाचे मुद्दे या अर्थसंकल्पात आहे. याचबरोबर सौरऊर्जा आणि सेंद्रिय शेती यावर देखील अर्थसंकल्पात भर दिला आहे.

महिलांसाठी ३ लाख कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज महिलांच्या वसतिगृहासाठी अर्थसंकल्पात निधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्याला सकारात्मक पद्धतीने केंद्राचा पाठिंबा मिळेल अशीच भूमिका केंद्र सरकारची दिसत आहे.

देशाला वचनपुर्तते सोबतच चेतना देणारा अर्थसंकल्प असे वर्णन यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here