*ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खारघर यांच्या वतीने शालाक्य तंत्र कान, नाक, घसा मोफत तपासणी शिबिराचे आयोजन*
ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था, खारघर यांच्या वतीने डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन वाय. एम. टी. आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, खारघर यांच्या सहकार्याने शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जेष्ठ नागरिक सामाजिक संस्था, घरकुल, सेक्टर – १५, खारघर , नवी मुंबई या ठिकाणी शालाक्य तंत्र कान, नाक, घसा मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. वाय. एम. टी. महाविद्यालय व रुग्णालयाच्या रिसर्च डायरेक्टर, नेत्र चिकित्सक तसेच शालाक्य तंत्र कान, नाक, घसा विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनीता विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाग्यश्री तेलगोटे, डॉ. माधुरी पवार, डॉ. साक्षी मोकळ, डॉ. वैशाली खडताळे, डॉ. अक्षता कचरे यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात कर्णबधिर ( ऐकणे कमी होणे / बहिरेपणा ) वर उपचार, शिरशूल / मायग्रेन, सतत शिंका येणे, जुनाट खोकला, नाकातून पाणी येणे व नाकातून रक्त येणे, चक्कर येणे, कानातून पाणी येणे, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, नाकाच्या हाडाची शस्त्रक्रिया, ऑडियोमेट्री ( बहिरेपणाची ) ची चाचणी, कान फुटणे, कानातून पू येणे, जुनाट सर्दी / शिंका येणे या सर्व आजारांचे मोफत मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात आली.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष एम. डी. सोनवणे, सेक्रेटरी ए. डी. बोराडे, उपाध्यक्ष विश्वनाथ इंडी, खजिनदार संतोष मोहिते, ज्येष्ठ सल्लागार उत्तम मुगदल, मुकुंद सोनवणे उपसचिव नामदेव गरुड, तसेच द कोंकण न्यूज डिजिटल मिडियाचे मुख्य संपादक उमेश मोहिते यांनी मेहनत घेतली. या शिबिराला घरकुल मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
उमेश मोहिते, नवी मुंबई






















