Home मुंबई *फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे...

*फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे यांचे निर्देश*

7
0

*मंत्रालय | मुंबई*

*फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे यांचे निर्देश*

*मुंबई,

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्यबाजार (फिश मार्केट) स्थापनेसाठी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या प्रस्तावांची वर्गवारी करून कामे टप्प्याटप्प्याने आणि गतीने पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.

आज मंत्रालयातील दालनात मत्स्यबाजाराबाबत आढावा बैठक झाली. बैठकीत मंत्री राणे यांनी सर्व प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला.

“सर्व प्रस्तावांची एकत्रित यादी तयार करून प्रत्येक कामाचा सविस्तर आराखडा तयार करा. फेजनिहाय कामे हाती घेऊन ती निर्धारित कालावधीत पूर्ण करा,” असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here