*’द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात – ‘बेबी आत्या’ बनून जिंकणार मनं!*
*मुंबई |* ‘शास्त्र असतं ते…’ हे वाक्य ऐकलं की डोळ्यासमोर येते ती अनी आणि जुईची लाडकी आई! घरातलीच एक वाटणारी सहजसुंदर अभिनेत्री म्हणजे *रेणुका दफ्तरदार*. ‘दोघी’, ‘बाधा’, ‘वळू’, ‘मन फकिरा’, ‘अनन्या’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’ मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या रेणुका ताई आता एका अगदी वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत – *’द्विधा’* चित्रपटातून!
*४ सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित* होणाऱ्या ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन *निलेश भास्कर नाईक* यांचे असून निर्मिती *विदुला रमेश आजगावकर* यांनी केली आहे.
*कोण आहे ‘बेबी आत्या’?*
या चित्रपटात रेणुका दफ्तरदार *’बेबी आत्या’* ही हळवी पण खंबीर व्यक्तिरेखा साकारत आहेत. प्रेमळ, समजूतदार आणि मायेने भरलेली बेबी आत्या ही कुटुंबाचा भावनिक आधारस्तंभ आहे. पतीच्या निधनानंतर एकटं आयुष्य जगणारी बेबी आत्या तिच्या भावालाच आपलं सर्वस्व मानते. स्वतःची दुःख मनात दडवून ती कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी कायम खंबीरपणे उभी राहते.
> “आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ‘बेबी आत्या’ माझ्या अभिनयाची एक वेगळी बाजू दाखवेल. मायेच्या ऊबेसोबतच आयुष्याच्या दुःखांना सामोरं जाणारी आणि नाती जपणारी ही आत्या कथेतली महत्त्वाची भावनिक कडी आहे,” असे रेणुका दफ्तरदार यांनी सांगितले.
चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
*SEO टायटल:*
Renuka Daftardar in Dvidha: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार ‘बेबी आत्या’च्या रूपात – ४ सप्टेंबरला प्रदर्शित
*





















