Home मुंबई काळवाडी पोषण आहार प्रकरणी लोकप्रतिनिधींचा दबाव?

काळवाडी पोषण आहार प्रकरणी लोकप्रतिनिधींचा दबाव?

21
0

काळवाडी पोषण आहार प्रकरणी लोकप्रतिनिधींचा दबाव? “लोकप्रतिनिधींनी प्रेशर आणणे ही गंभीर बाब; हे अजिबात सहन केलं जाणार नाही!”.विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय पोषण आहार मिळायलाच हवा; काळवाडीतील निकृष्ट पोषण आहाराबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना पत्र लिहून माहिती दिली:- माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

जुन्नर|
तालुक्यातील काळवाडी येथील निकृष्ट पोषण आहाराच्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी दबाव आणला असेल, तर ही गंभीर बाब असून, असा दबाव सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे
काळवाडी येथे पुरवण्यात आलेल्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या होत्या. निकृष्ट दर्जाचा कच्चा माल पुरवला जात असल्याच्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी सरपंच व गावकऱ्यांवर दबाव आणला असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशी भूमिका दिलीप वळसे पाटील यांनी मांडली.
“हे सहन केलं जाणार नाही. विद्यार्थ्यांना आणि बालकांना चांगला, दर्जेदार पोषण आहार मिळायलाच हवा,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
काळवाडीतील निकृष्ट पोषण आहाराबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्र लिहून संपूर्ण बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली.
आता या प्रकरणात प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई होते आणि लोकप्रतिनिधींच्या कथित दबावाच्या आरोपांची चौकशी होते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
#काळवाडी #पोषणआहार #पोलखोलपोषणाचा #दिलीपवळसेपाटील #जुन्नर #अंगणवाडी #पोषणआहारप्रकरण #निकृष्टपोषणआहार #पुणे #शालेयपोषणआहार #लोकप्रतिनिधी #प्रशासन #महाराष्ट्र #BreakingNews #MarathiNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here