Home मुंबई *वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा*

*वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा*

12
0

*वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा*

*दुचाकी वाहनांसाठी ६० रुपये, डिझेल वाहनांसाठी १८० रुपये शुल्क*

मुंबई, दि. २३ : राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र स्टेट पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयूसी शुल्काच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीचा अभ्यास करण्यासाठी परिवहन विभागाने त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. समितीने अन्य राज्यांमधील पीयूसी तपासणीचे प्रचलित दर तसेच विविध बाबींचा अभ्यास करून दरवाढीबाबत अहवाल सादर केला होता.

सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांसाठी पीयूसी तपासणी शुल्क ५० रुपयांवरून ६० रुपये, पेट्रोलवरील तिनचाकी वाहनांसाठी १०० रुपयांवरून १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी १२५ रुपयांवरून १५० रुपये, तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात आले आहे.

सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सुधारित दरांची अंमलबजावणी सर्व पीयूसी केंद्रांवर होत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, विहित दरांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी वायुवेग पथकांनाही आवश्यक सूचना देण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here