*MAI MEDIA 24 EXCLUSIVE | FINAL 2.0 REPORT*
* नव्याने पुन्हा एकदा*
ब्रेकिंग : सरकारी खेळ म्हणून मान्यता देण्याचा डाव फसला!
गोविंदा नागेश भोईरची १७ वर्षांची वेदना कायम – “जिंदगी ना मिलेगी दोबारा”*
*२० ऑगस्ट – भिवंडी -*
२० ऑगस्ट. भिवंडीचे गोविंदा *नागेश भोईर* यांचा ४१ वा वाढदिवस. पण वाढदिवस केकवर नाही, *स्पेक्ट्रम हॉस्पिटल, अंजुरफाटा, भिवंडी* च्या बेडवर साजरा होतोय.
२००९ ते २०२६ – १७ वर्षे. एका अपघाताने आयुष्यच संपलं. ४१ पैकी १७ वर्षे बेडवर.
आणि याच बेडवरून ते आजही तेच सांगतायत –
> *”दहीहंडी हा सण म्हणून साजरा करा, स्पर्धा म्हणून नको. जिंदगी ना मिलेगी दोबारा… गणपती बाप्पा मोरया!”*
*सरकारी खेळ म्हणून मान्यता देण्याचा डाव कसा फसला?*
हाच तर या बातमीचा सर्वात मोठा खुलासा आहे, जो *MAI Media 24* ने पुन्हा समोर आणलाय.
*१८ ऑगस्ट २०२२ -* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषण केली – दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा, प्रो-दहीहंडी, १० लाख विमा, नोकरीत आरक्षण.
*४ सप्टेंबर २०२२ – सामना दैनिक – पान ३ – West Maharashtra Edition -* याच घोषणेविरुद्ध प्रसिद्ध व्यंगचित्रकार *प्रशांत आष्टीकर* यांनी हल्लाबोल केला. सामनात बातमी छापून आली – *’दहीहंडीला खेळाची मान्यता देणे घटनाबाह्य’*
आष्टीकर म्हणाले होते – _”दहीहंडी हा हिंदू सण आहे, त्याला पौराणिक आधार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा. हा निर्णय रद्द करा, अन्यथा सर्व हिंदू संघटना रस्त्यावर उतरतील.”_
*आणि या एका बातमीनंतर डाव फसला!*
या बातमीनंतर विरोधक आक्रमक झाले. सरकारला बॅकफूटवर जावे लागले. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना खुलासा करावा लागला – *”वेगळं आरक्षण नाही, आहे त्या ५% क्रीडा कोट्यातच समावेश.”*
म्हणजे *सरकारी खेळ म्हणून स्वतंत्र मान्यता आणि स्वतंत्र आरक्षण देण्याचा डाव फसला*, बिल ड्रॉप करावे लागले. फक्त GR शिल्लक राहिला.
*मग GR पाळला जातोय का?*
*अजिबात नाही!*
*कोर्ट काय सांगतं? (०७ ऑगस्ट २०१७) -*
– उंची २० फूट / ४ थर मर्यादा
– १४ वर्षाखालील मुलांना बंदी
*GR काय सांगतो? (११ ऑगस्ट २०१५) -*
– प्रत्येक गोविंद्याचा विमा, हेल्मेट, बेल्ट, मॅट, डॉक्टर बंधनकारक.
*नेते काय करतात?*
कोर्ट २० फूट सांगतं, पण नेते लाखोंची बक्षिसं – १, ५, ११ लाख जाहीर करून ५० फूटी, ९-१० थरांच्या हंड्या लावायला लावतात. DJ, नाच, बॅनरबाजी.
*याचाच बळी आहे नागेश भोईर.* ते म्हणतात – *”पिसाळलेल्या राजकारण्यांनी सणाची माती केलीय!”*
*बिल ड्रॉप झालं, पण वेदना ड्रॉप झाल्या नाहीत.*
*MAI Media 24 ची मागणी -*
१. २० फूटाचा नियम तोडणाऱ्या आणि १४ वर्षाखालील मुलांना घेणाऱ्या मंडळांवर व बक्षीस जाहीर करणाऱ्या नेत्यांवर अवमान याचिकेनुसार गुन्हा दाखल करा.
२. गोविंदा नागेश भोईर यांच्या उपचाराचा खर्च सरकारने उचलावा.
*४१ व्या वाढदिवशी संकल्प करूया – हंडी खाली आणा, सुरक्षा वाढवा. एकही नागेश भोईर पुन्हा घडू देणार नाही.*
बाकी तुम्ही समजदार आहातच!*
*- टीम MAI Media 24*
*https://maimedia24.com/23181/*
—






















