*पिंपळवंडी येथे पीडित कुटुंबीयांची भेट;पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील – वैशाली नागवडे*
मुंबई दि. २० ऑगस्ट – जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या निर्घृण आणि संतापजनक कृत्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आज घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली.
पीडीत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देताना या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास वैशाली नागवडे यांनी दिला.
मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वैशाली नागवडे यांनी पोलीस यंत्रणेकडे केली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, जुन्नर तालुका महिलाध्यक्षा सुप्रिया लेंडे व इतर महिला सहकारी उपस्थित होत्या.




















