Home महाराष्ट्र हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना, अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना, अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात

191
0

*हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना, अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात*

*मुंबई दंगलीसह बाबरी मस्जीद अभ्यासक्रमातून पोहोचले साता समुद्रापलीकडे*

लातूर
लातूर शहरातील लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शनिवार दि १३ जुलै २०२४ रोजी मुंबईहून आलेले व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन
बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे काम सातासमुद्रापलिकडे पोहोचल्याची माहिती दिली.
मात्र आपल्या महाराष्ट्रात वा देशात असा गौरव झाला नसल्याची खंतही व्यक्त केली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांची दखल घेऊन अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात मुंबई दंगल व बाबरी मज्जिद उध्वस्त केलेल्या १९८९ सालच्या प्रकरणाचा अभ्यासक्रमातून सातासमुद्रापलीकडे
जार्ज मेसन सुनिव्हर्सिटीच्या चार्लस हाँस याने लिहिलेल्या
“कम्परेटीव्ह पॉलिटिक्स” या ग्रंथात चॅप्टर १२ मध्ये India
हा विषय आहे.
यात पान ३५१ वर हिंदुराज्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा wide world Photo एजन्सीने प्रसारीत केलेला फोटो छापून शिवसेनेच्या कार्याविषयीची दखल घेतल्याची माहिती आज व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी लातूर येथील पत्रकार परिषद घेत पत्रकारांना बोलताना माहिती दिली
बाळासाहेबांनी विदेशी कंपन्यांना केलेला विरोध, बाबरी मस्जीद उध्वस्त प्रकरण, मुंबईतील दंगलीत ९६०० मृत्यु
वगैरे गोष्टी समाविष्ट आहेत.
अमेरिका तसेच जगातील अनेक विद्यापीठातून
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिकविले जातात. बाबासाहेबांनी ”असाही शिब्यून” ह्या जपानी दैनिकातून व्यंगचित्रकारिता केली असून चर्चील असलेल्या वरील पुस्तकात शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे समाविष्ट आहेत.
जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी शिवसेना सुद्धा सातासमुद्रापलीकडे जागतिक स्तरावर नेवून ठेवली असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
“कम्पॅरेटीव पॉलिटिक्स” हा ग्रंथ “थॉम्सन वर्डस्वर्थ”
कंपनीने प्रकाशित केला असून ऑस्ट्रेलिया, कॅनडा,
मेक्सीको, सिंगापूर, स्पेन, युनायटेड किंगडम आणि
युनायटेड स्टेट् येथे कंपनीची कार्यालये असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here