Home मुंबई *मल्लिकार्जून खर्गेंनी जाहीर सभा घेतलेल्या जागेचे शुद्धीकरण करणाऱ्या मनुवादी ना लायकांवर कारवाई...

*मल्लिकार्जून खर्गेंनी जाहीर सभा घेतलेल्या जागेचे शुद्धीकरण करणाऱ्या मनुवादी ना लायकांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड*

29
0

*मल्लिकार्जून खर्गेंनी जाहीर सभा घेतलेल्या जागेचे शुद्धीकरण करणाऱ्या मनुवादी ना लायकांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड*
*मल्लिकार्जून खर्गेंचा अपमान हा दलित, वंचित, मागास समाज व संविधानचा अपमान, श्रीराम सेनेच्या कृतीचा जाहीर निषेध.*

मुंबई, दि. १३ ऑगस्ट ..

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंड मधील हल्दवानीमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेनंतर श्रीराम सेनेने सभास्थळी शुद्धीकरण विधी केला, ही घटना केवळ एका नेत्याचा अपमान नाही तर संविधानाच्या समानतेच्या मूल्यांची उघड खिल्ली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्ष झाली पण आजही दलित नेत्याचा अपमान करण्यासाठी शुद्धीकरणाचे विधी केले जात असतील, तर ही केवळ एका संघटनेची विकृती नाही, तर मनुवादी विचारांची उजळणी आहे. सभास्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्या मनुवादी नालायकांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीर सभेला संबोधित केले. काँग्रेस अध्यक्ष खरगे विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून त्यांच्याविरोधात शुद्धीकरण केले का? माणसाच्या जातीवरून त्याला शुद्ध-अशुद्ध ठरवण्याचा अधिकार श्रीराम सेनेला कोणी दिला? भाजपचा या घटनेशी काही संबंध नसल्याचा दावा असेल, तर मग जातीय द्वेषाचे प्रदर्शन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी भाजप सरकार पुढे का येत नाही? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा अपमान म्हणजे प्रत्येक दलित, वंचित आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या भारतीयाचा अपमान आहे. या प्रकरणी भाजपने आरोप फेटाळण्यापेक्षा जातीय भेदभावाच्या या मानसिकतेविरोधात नेमकी भूमिका काय ते स्पष्ट करावे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here