जागतिक कुत्रा दिन विशेष: कागदावरची नसबंदी आणि रस्त्यावरचा थरार; मुक्या प्राण्यांचे मरण की भ्रष्ट व्यवस्थेचा कळस?
‘कल्याण-पुणे तर झाकी आहे, सारा महाराष्ट्र बाकी आहे!’
विशेष शोधनिबंध व जाहीरनामा Maimedia24 वृत्तसेवा
आज जगभरात ‘जागतिक कुत्रा दिन’ (World Dog Day)साजरा होत आहे. पण महाराष्ट्रातील गल्लीबोळांतील चित्र पाहिले तर हा दिवस ‘कृतज्ञतेचा’ कमी आणि ‘भीती व भ्रष्टाचाराचा’ अधिक वाटतो. पुण्यात चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला आणि कल्याणमध्ये नसबंदीचा दावा करूनही कुत्री गर्भार राहण्याचा घोटाळा – या दोन घटनांनी संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. हा केवळ कुत्र्यांचा प्रश्न नाही, तर प्रशासकीय भ्रष्टाचाराचा महाघोटाळा आहे.
१. मूळ यंत्रणा: कुत्रा संरक्षण आणि नियंत्रण कोणाच्या हाती?
●केंद्र स्तर: मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय अंतर्गत भारतीय प्राणी कल्याण मंडळ (AWBI)
●राज्य स्तर:महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ (MAWB)आणि राज्य पशुसंवर्धन विभाग
●स्थानिक स्तर:महानगरपालिकांचा पशुवैद्यकीय आरोग्य विभाग – KDMC, PMC, BMC
●२.असंवेदनशीलतेचा कळस: कल्याण आणि पुण्याचे वास्तव●
. ●*कल्याण-डोंबिवली ‘गर्भार’ घोटाळा● कानाला V-Notch मारूनही कुत्री गर्भार. मुख्य केंद्र २ वर्षांपासून बंद. कोट्यवधी रुपये गेले कुठे?
पुणे-पिंपरी हल्ला: ४ वर्षांच्या बालिकेवर ७-८ कुत्र्यांचा हल्ला.८०+ टाके. वेळेत कुत्रे नसबंदी नाही.
●३ ‘कागदावरच्या’ NGOs आणि भ्रष्टाचाराचा पॅटर्न●
●टेंडरचा खेळ:●कोट्यवधींचे टेंडर कागदावरच्या संस्थांना?
●पेपर स्टरलायझेशन:● फक्त , कुत्र्यांचे
कान कापून बोगस बिले ?
●अधिकारी-कंत्राटदार युती:टक्केवारी घेऊन बिले मंजूर
●४. सर्व सरकारी यंत्रणांचे सामूहिक अपयश●
नगरविकास + पशुसंवर्धन + पोलीस – तिन्ही विभागांचे अपयश. फिडिंग झोन्स नाहीत, लसीकरण नाही, तक्रारींकडे दुर्लक्ष.
●५. ‘फिडिंग झोन्स’: ABC नियम २०२३ नुसार बंधनकारक●
शाळा, मैदानांपासून दूर. नियुक्त अन्न क्षेत्रे हवीतच उपाशी कुत्रे = हिंस्र कुत्रे. असे प्रकार वाढत आहेत.
●६. Maimedia24 चा ५ कलमी जाहीरनामा●
१. डिजिटल जिओ-टॅगिंग सक्तीचे
२. थर्ड-पार्टी ऑडिट + ब्लॅकलिस्ट + FIR
३. RTI आणि जनता ऑडिट
४. १००% रेबीज लसीकरण
५. कचराकुंडी मुक्त परिसर
●’Maimedia24′ चा प्रशासनाला थेट सवाल!●
●नसबंदी यशस्वी आहे तर संख्या का दुप्पट?● ●एकाही अधिकाऱ्याला जेल का नाही?●
निष्कर्ष काय तर जोपर्यंत प्रशासन कागदावरून जमिनीवर उतरत नाही, तोपर्यंत ना नागरिक सुरक्षित ना मुके प्राणी!
© *Maimedia24* विशेष संपादन दस्तऐवज
●वाचकांसाठी आवाहन●
तुमच्या वॉर्डातही ‘कागदावरचा कारभार’ सुरू आहे का? कमेंटमध्ये लिहा. हा लेख मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा!
—






















