दहा वर्ष घेतलेल्या कष्टाला अखेर फळ मिळाले – भावाची बहिणीला भेट
शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण स्थगित
पत्रकार महामंडळ गठीत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळासाठी ( वेल्फेअर बोर्ड ) माईच्या अध्यक्ष शीतलताई करदेकर बुधवारपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसल्या होत्या आज गुरुवार रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष दालनात भेट घेऊन शीतलताईंची असलेली प्रमुख मागणी म्हणजे पत्रकारांसाठी महामंडळ बनावे यासाठी येत्या आठवड्याभरात चर्चा करून मार्ग काढू तसे लेखी असे सांगून आता आपले आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती केली मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन शीतलताईंनी आंदोलन मागे घेतले !
त्यांना,आ प्रसाद लाड व आ नितेश राणे यांनी इलेक्ट्रॉल पाणी पाजले





















ताईंच्या हिमतीचा व एकजुटीचा विजय आहे, मागितल्याशिवाय काही मिळत नाही हे परत एकदा सिद्ध झाले. इथूनपुढच्या काळात खूप आव्हाने आपल्याला झेलायची आहेत त्याकरिता एकत्र राहून लढा देऊ