Home Trending Now *९ ऑगस्ट क्रांतीदिन, रुपेरी पडद्यावरील चित्रण आणि वाळव्याचा धगधगता इतिहास*

*९ ऑगस्ट क्रांतीदिन, रुपेरी पडद्यावरील चित्रण आणि वाळव्याचा धगधगता इतिहास*

28
0

*९ ऑगस्ट क्रांतीदिन, रुपेरी पडद्यावरील चित्रण आणि वाळव्याचा धगधगता इतिहास*
_लेखन/संशोधन: शीतल हरीश रामचंद्र (बुवा) करदेकर (लग्नापुर्वी: उज्ज्वला कृष्णकांत भानुसे), इटकरे-वाळवा_
माईमीडिया24 – विशेष वृत्त
संशोधक: शीतल हरीश करदेकर

●१. गोवालिया टँक ते वाळवा – एकाच लढ्याचे दोन केंद्र●
●८ ऑगस्ट १९४२● रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या विशाल सभेत महात्मा गांधींनी संपूर्ण देशाला ●करा किंवा मरा’● चा मंत्र दिला. ‘इंग्रजांनो भारत छोडो’ हा ठराव संमत होताच ब्रिटिश सरकार घाबरले. ९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटे काँग्रेसचे सर्व मोठे नेते एकाच वेळी अटक करण्यात आले. त्यामुळे देशभरात नेतृत्वाविना चळवळ भूमिगत झाली.
अशा वेळी अरुणा असफ अली यांनी गोवालिया टँकवर धाडसाने तिरंगा फडकावला आणि तरुणांना पेटवले. त्याच रात्री डॉ. उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईतून काँग्रेस रेडिओ म्हणजेच भूमिगत रेडिओ सुरू केला. हा रेडिओ ब्रिटिशांच्या नजरचुकीने महिनोंमहिने चालला आणि आंदोलनाचा आवाज गावागावात पोहोचवला.
मुंबईतून सुरू झालेली ही ठिणगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली. त्याच लढ्याचा सर्वात धगधगता आवाज वाळवा तालुक्यात घुमला.

●●२. रुपेरी पडद्यावरची ऑगस्ट क्रांती●●
●१. ए वतन मेरे वतन – २०२४●
डॉ. उषा मेहता यांनी चालवलेल्या सिक्रेट रेडिओची कथा आहे. सारा अली खानने उषा मेहतांची भूमिका केली आहे. ब्रिटिशांच्या सेन्सॉरशिपला चकमा देऊन काँग्रेसचा संदेश पोहोचवला. महिलांच्या धैर्याची आणि देशभक्तीची प्रेरणादायी गोष्ट आहे.
●२. गांधी – १९८२●
रिचर्ड अ‍ॅटनबरो दिग्दर्शित ऑस्कर विजेता आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे. बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. ८ ऑगस्ट १९४२ च्या “करा किंवा मरा” भाषणाचे प्रभावी चित्रण आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला जगासमोर मांडणारा महत्त्वाचा सिनेमा आहे.
●३. हे राम – २०००●
कमल हासन लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत चित्रपट आहे. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कथा आहे. वैयक्तिक जीवन आणि राष्ट्रीय चळवळ यांचा संघर्ष दाखवला आहे. ऐतिहासिक घटनांना मानवी नात्यांशी जोडून मांडले आहे.
●४. क्रांती – १९८१●
मनोज कुमार निर्मित आणि दिग्दर्शित देशभक्तीपर चित्रपट आहे. १८५७ ते १९४२ पर्यंतच्या स्वातंत्र्यलढ्याची गाथा आहे. “एक बार तो जिंदगी दे” हे गाणे आजही लोकप्रिय आहे. तरुणांमध्ये देशासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत केली.
●५. फिल्म्स डिव्हिजनचे लघुपट – ९ ऑगस्ट आणि डू ऑर डाय*
भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने तयार केलेले माहितीपट आहेत. १९४२ च्या आंदोलनाचे मूळ दृश्य आणि बातम्या यात आहेत. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून यांचे मोठे महत्त्व आहे. शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा समजावण्यासाठी दाखवले जातात.

●३. वाळव्याचा धगधगता इतिहास आणि ‘पत्री सरकार’●
गोवालिया टँकचा नारा वाळव्यात कृतीत उतरला. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांची सत्ता मोडीत काढली. कार्यक्षेत्र: १५०+ गावे,. १९४३ ते १९४६ पर्यंत ‘प्रतिसरकार’ चालवले. ‘आपुला आपण करू कारभार’ हे ब्रीद होते. ●सशस्त्र पथक ‘तुफान सेना’ – सुमारे ५००० तरुण.
●पत्री सरकारची न्यायालयं● ब्रिटिशांच्या कायद्याला पर्याय म्हणून लोकन्यायालये सुरू केली. गरीबांना त्वरित, मोफत आणि भ्रष्टाचारविरहित न्याय मिळत होता. ●प्रमुख न्यायालयं: शेणवडी, नेरले, मलवडी, बेलवाडी येथे जमीन, कर्ज आणि सामाजिक भांडणांचे निकाल तातडीने दिले जात होते.
●महत्त्वाची घटना: ७ जून १९४३ – शेणोली रेल्वे लूट. कराड जवळील शेणोली येथे ब्रिटिशांची पगाराची ट्रेन थांबवून खजिना जप्त केला गेला.
●शिक्षण कार्य: गुप्त शाळा, वसतिगृहे, ‘कमवा आणि शिका’ ला पाठिंबा.
●वैयक्तिक नोंद – माईमीडिया24 च्या संपादक संशोधक शीतल करदेकर यांचे वडील कृष्णकांत तातोबा भानुसे यांनी शाळकरी वयात वाळवा तालुक्यातील तलाठी कार्यालयावर तिरंगा फडकवला होता. ही आठवण ते नेहमीच अभिमानाने सांगत . अशा अनाम वीरांनी दिलेले छोटे योगदानही या क्रांतीतील एक आहुती होती हे नक्की!

निष्कर्ष
९ ऑगस्ट १९४२ने ब्रिटिशांना स्पष्ट संकेत दिला. गोवालिया टँकवर अरुणा असफ अली यांनी पेटवलेली मशाल आणि भूमिगत रेडिओ ने दिलेला आवाज वाळव्याच्या मातीत पूर्णत्वाला गेला. देशभर वणवा पेटला . बाल युवा आणि सर्वच सहभागी झाले..या आंदोलनांनंतर अवघ्या ५ वर्षांनी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.

या सर्व वीरांना फक्त क्रांतीदिनीच नाही तर आयुष्यातील हर एक क्षण मानवंदना देईल. पण मिळालेले स्वातंत्र्य त्याच विचारांनी जपणं आवश्यक आहेच.

—–
*तुमचा आवडता स्वातंत्र्यलढ्यावरचा सिनेमा कोणता? कमेंटमध्ये सांगा* 👇

*संदर्भ*
१. राष्ट्रीय अभिलेखागार, नवी दिल्ली – भारत छोडो आंदोलन फायली
२. फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया – “९ ऑगस्ट” आणि “डू ऑर डाय” माहितीपट
३. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, भारत सरकार – स्वातंत्र्यलढ्यावरील प्रकाशने
४. क्रांतीसिंह नाना पाटील स्मारक समिती, वाळवा – पत्री सरकार दस्तऐवज
५. स्थानिक मुलाखती आणि कौटुंबिक नोंदी – इटकरे, वाळवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here