*क्रांती दिनाचे औचित्य साधुन सायबर गुन्हे निर्मुलन संघर्ष समितीची स्थापना व सायबर गुन्हे निर्मुलन निर्धार आंदोलन*
******************************
*सोलापूर (प्रतिनिधी ) – दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांत मध्ये कमालीची वाढ होत आहे. ही वाढ अत्यंत चिंताजनक आहे. सर्व सामान्य जनतेची वैयक्तीक माहिती विविध प्रलोभने, आश्वासने, स्किम सांगून, इन्शोरन्स च्या नावाने हे गोडीत पैसे उकळतात. यामध्ये* *सहकारी बँक, पतसंस्था, सरकारी बँकांच्या नावाचा सर्रास वापरले जाते. या संस्थांचा अर्था अर्थी काहीच संबंध नसतो. या शक्यतो नॉन बँकिंग* *फायनान्स असतात. त्यांना मान्यता असतात पण त्या रिजर्व्ह बँकेच्या मान्यतेनेच चालतात असे समजते. दुर्भाग्य म्हणजे यांचे सावज हे अशे व्यक्ती असतात ज्यांचा सिबील खराब आहे किंवा मोठ्या बँकांच्या थकबाकीदार असतात व त्यांना कोणीही कर्ज पुरवठा करत नाहीत. १ हजार ते ५ लाखा पर्यंतचा तपास सदरील गुन्हा सायबर गुन्हे विभागाकडून तपासला जात नाही. तो गुन्हा संबंधित गुन्हा घडलेल्या* *भागातील ठाण्याकडे वर्ग केला जातो. सदरील ठाण्यामध्ये सायबर गुन्हे तपासण्याची यंत्रणा अत्यंत कमकुवत व कुचकामी असते. त्याबाबत मा. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व अग्रणी बँकेकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचा योग्य शासनाकडून योग्य पाठपुरावा होत नाही*.
*पोलीस यंत्रणेतील कमकुवत यंत्रणेचा फायदा हे गुन्हेगार घेतात. तसे पाहता ही एक चोरी आहे. या चोरीला आळा बसावे म्हणून व जनतेची आर्थिक फसवणूक होऊ नये आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण व्हावे, जनजागृती व्हावी यासाठी आज ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती दिनी ज्येष्ठ नेते व पत्रकार विष्णु कारमुरी महाराज यांच्या नेत्तृत्वाखाली सायबर गुन्हे निर्मुलन संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या द्वारे घडत असलेल्या सायबर गुन्ह्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन या मध्ये फसवणूक झालेल्या नागरीकांना न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे बोलून दाखविले व ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास आपल्या संपर्क करावे. त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करुन त्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही ही दिली*.
*त्याच बरोबर घडत असलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा यासाठी साबर गुन्हे निर्मुलन निर्धार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील पुनम गेट येथे या आंदोलनाची सुरुवात झाली. प्रथम पोलीस ठाण्यात अद्यावत सायबर विभाग करावे. १ हजार ते ५ लाख पर्यंतच्या आर्थिक फसवणूकी संदर्भात योग्य व तातडीने कारवाई व्हावी. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावे अशी मागणी ज्येष्ठ नेते व संस्थेचे निमंत्रक विष्णु कारमपुरी महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. यावेळी युवा क्रांती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी आपला पाठिंबा दिला व सायबर गुन्हेगारीवर प्रकाश टाकत २-३ दिवसापूर्वीच झालेल्या घटनेचा दुजोरा दिला व सदरील आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला. ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळेस संस्थेचे अध्यक्षांनी पत्रकारांशी बोलतांना सदरील सायबर गुन्हे विभाग सक्षम करणे व पिढीताला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावे. त्यासाठीच ही संस्था स्थापन झाली आहे. जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठ पुरावा करण्याचे आश्वासन दिले*.
*या आंदोलनात विठ्ठल कुर्हाडकर, गुरुनाथ कोळी, पप्पु शेख, श्रीनिवास बोगा, कोडम , जरगीस मुल्ला, राहुल गुजर, प्रशांत जक्का आदींनी सहभाग घेतला* .
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *क्रांती दिनाचे औचित्य साधुन सायबर गुन्हे निर्मुलन संघर्ष समितीची स्थापना व सायबर...




















