८ ऑगस्ट : मराठी रंगभूमीचा सुवर्णयोग – ‘संगीत मत्स्यगंधा’ ते ‘साष्टांग नमस्कार’
– शीतल हरीश करदेकर
मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही तारखा सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जातात. त्यापैकीच एक तारीख म्हणजे ‘८ ऑगस्ट’
या एकाच दिवशी, वेगवेगळ्या वर्षांत, मराठी नाट्यसृष्टीला दोन मैलाचे दगड लाभले. एकीकडे संगीताची अलौकिकता असलेले ‘संगीत मत्स्यगंधा’ आणि दुसरीकडे सामाजिक ढोंगावर प्रहार करणारे आचार्य अत्रे यांचे ‘साष्टांग नमस्कार’
●१. ८ ऑगस्ट १९६४ : संगीत मत्स्यगंधा -● संस्थाश्रयातून घडलेला इतिहास
मराठी संगीत नाटक लोप पावत असताना ८ ऑगस्ट १९६४ रोजी ‘द गोवा हिंदू असोसिएशन’, मुंबई निर्मित ‘संगीत मत्स्यगंधा’ चा पहिला प्रयोग झाला. या नाटकाने केवळ यश मिळवले नाही, तर संपूर्ण संगीत नाट्य चळवळीला नवसंजीवनी दिली.
●महत्त्वाचे टप्पे:
निर्मिती संस्था: ‘द गोवा हिंदू असोसिएशन’ ने नफ्याचा विचार न करता दर्जेदार कलेसाठी केलेले हे मोठे पाऊल होते.
दूरदर्शी नेतृत्व: संस्थेचे नाट्य विभाग प्रमुख गोपीनाथ सावकार यांनी याआधी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिली ३ही वर्षे दि गोवा हिंदू असोसिएशन च्या नाटकाची मोहोर उमटवली होती.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यातील संगीत दिग्दर्शन , वसंत कानेटकरांचे भक्कम कथानक आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शास्त्रीय बैठक असलेले, पण रसिकाभिमुख संगीत.
अजरामर कलाकार:
आशालता वाबगावकर – ‘सत्यवती’च्या भूमिकेत. ‘गर्द सभोवती रान साजणी’, ‘तव भास अंतरा झाला’ ही गाणी त्यांच्या आवाजामुळे अजरामर झाली.
पंडित रामदास कामत- ‘पराशर ऋषी’च्या भूमिकेत. ‘गुंतता हृदय हे’ हे गाणे आजही शास्त्रीय आणि नाट्य संगीताची ओळख आहे.
परिणाम काय ‘मत्स्यगंधा’ नंतर संगीत नाटकांना पुन्हा एकदा प्रेक्षक मिळाले.
हे दोन्ही कलावंत नटवर्य गोपीनाथ सावकार यांचे शिष्य , रंगभूमीवर पदार्पण ते एक उत्तम कलावंत म्हणून या दोन्हीही महान कलावंतांना रंगमंचावरील अभिनयाची शिदोरी मिळाली ती गोपियन सावकार यांच्या मुळे आणि मत्स्यगंधेतील गाणी अभिनय आणि रेखीव बांधणी असलेले नाटक अजरामर झाले.
●२. ८ ऑगस्ट १९३३ : साष्टांग नमस्कार – विनोदी नाटकांचा नवा मानदंड ठरले.●
८ ऑगस्ट १९३३* रोजी आचार्य *प्रल्हाद केशव अत्रे* लिखित आणि ‘बलवंत संगीत मंडळी’ निर्मित ‘साष्टांग नमस्कार’ चा पहिला प्रयोग झाला.
●महत्त्वाचे टप्पे:●
विषय: पत्रिका, ग्रहदशा आणि ज्योतिषावर आधारित जीवन जगणाऱ्या समाजातील ढोंगावर केलेला बुद्धिनिष्ठ प्रहार होता तोही हसत हसत.
नवा विनोद: अंगविक्षेपाऐवजी संवाद, शब्दच्छल आणि उपरोधावर आधारित ‘फार्स’ या प्रकाराला मराठीत प्रतिष्ठा मिळवून दिली.
अजरामर संवाद: ‘मी तर केवळ निमित्तमात्र!’ तात्यासाहेब आणि भटजी यांच्यातील मिश्कील संवाद आजही तितकेच प्रासंगिक आहेत.
●८ ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व●
दोन प्रवाह: वर्ष वेगळी असली तरी एकाच तारखेला गंभीर संगीत नाटक आणि सामाजिक विनोदी नाटक
दोन दिग्गज: नाटककार वसंत कानेटकर आणि नाटककार आचार्य प्र.के. अत्रे
संस्थाश्रय: ‘गोवा हिंदू असोसिएशन’ सारख्या संस्थांचा कलापोषक पुढाकार
कालातीतत्व:९० वर्षांनंतरही ‘साष्टांग नमस्कार’ आणि ६० वर्षांनंतरही ‘मत्स्यगंधा’ तितकेच लोकप्रिय आहे.
निष्कर्ष काय तर
८ ऑगस्ट ही केवळ तारीख नसून मराठी रंगभूमीच्या वैविध्याचा, कलात्मक उंचीचा आणि सामाजिक जाणिवेचा उत्सव आहे. ‘मत्स्यगंधा’ ने संगीत नाटकाला आणि ‘साष्टांग नमस्कार’ ने विचाराला नवी उंची दिली.
_अत्रेंच्या मातीतला साष्टांग नमस्कार_
– शीतल हरीश करदेकर (माई)
*Tags*: #8August #MarathiRangbhumi #Matsyagandha #SashtangNamaskar #GoaHinduAssociation #AcharyaAtre #MarathiTheatre
—























