Home मुंबई डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा मोठा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला-...

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा मोठा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला- खासदार वर्षा गायकवाड

35
0

मुंबई, दि. १८ जुलै..
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते, प्रखर समाजवादी विचारवंत, ‘युवक क्रांती दल’ चे संस्थापक आणि पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि लोकशाही चळवळीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा मोठा आधारवड काळाच्या पडद्याआड गेला, अशा भावना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्या आहेत.
खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, डॉ. कुमार सप्तर्षी हे महात्मा गांधी स्मारक निधी ट्रस्टचे अध्यक्ष होते, विधिमंडळाचे सदस्यही होते. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे चिकित्सक विचार, निर्भीड भूमिका, प्रभावी वक्तृत्व आणि कुशल संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी आयुष्यभर लोकशाही व संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, मानवाधिकार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अखंड संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, अशा भावना व्यक्त करून डॉ. कुमार सप्तर्षी यांना खासदार वर्षा गायकवाड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here