*ज्येष्ठ अभिनेते राम काजरोळकर यांचा अभीष्टचिंतन सोहोळा उत्साहात ; ८९ व्या वर्षात केले पदार्पण* मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते राम काजरोळकर यांचा ८८ वा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अतीशय उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनेते राम काजरोळकर हे नवी मुंबई सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष असून नाट्य सिनेमा आणि मालिका क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार म्हणून ओळखण्यात येतात. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, सचिन जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे सहसचिव राजेंद्र कदम, संघाचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, माजी खजिनदार विष्णुदास मुखेकर, बुद्धिबळ विजेते रमेश मोहिते, चित्रपट अभिनेते शिवाजी पाटणे, संघाचे कार्यकर्ते नारायण साखरे, हास्य क्लब योगाचे योगशिक्षक भरत खरात उपस्थित होते. राम काजरोळकर यांना माजी नगरसेवक दिलीप बोराडे, शिवसेना (उबाठा)चे उपशहर प्रमुख अजय पवार, समाजसेवक अविनाश जाधव, गणेश कमळे आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतन केले आणि उदंड आयुष्य तसेच ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो अशा शुभेच्छा दिल्या.



















