Home Trending Now आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?” ...

आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?” कारण ‘राजा’ने ठरवलंय:- शीतल हरीश करदेकर

100
1

हा प्रश्न नाही – हा ‘आक्रोश’ आहे.

“आम्ही कर भरतो सेस भरतो मग हा असा बकालपणा नशिबी का?” – कारण ‘राजा’ने ठरवलंय: तुम्ही ‘कर’ द्यायचा, आणि तो ‘मजा’ करायचा._ – *शीतल हरीश करदेकर*
या प्रश्नाचं उत्तर १ शब्दात: ‘हिशोब’ नाही.

‘कर’ देऊनही ‘बकालपणा’ नशिबी का येतो? कारणं:_
१. ‘कर’ जातो ‘दिल्लीला’, ‘बकालपणा’ राहतो ‘मुंबईत’        मुंबई देते:_ वर्षाला _५ लाख कोटी_ केंद्राला – आयकर, GST, कस्टम ड्युटी.
मुंबईला मिळतं:५० हजार कोटीपण नाही. १०% परत येत नाही.
म्हणजे: आपण १०० रुपये दिले, ‘राजा’ने १० रुपये परत केले. ९० रुपयांनी ‘बुलेट ट्रेन’ बांधली, ‘पुतळे’ उभे केले. पण आपल्या घरासमोरचा मॅनहोल ९० रुपयात पण बंद केला नाही.
पण _’सोन्याची अंडी’ देणाऱ्या कोंबडीला(मुंबई)’चारा’च मिळत नाही.
२. ‘करा’चा पैसा ‘विकासा’वर नाही, ‘इव्हेंटा’वर जातो.
तुम्ही ‘सेस’ दिला कशासाठी? ‘राजा’ने खर्च केला कुठे? विचार करायला हवा
*रस्ते सेस* – १७२२ कोटींचा ‘एक’ पूल. पण ५०० ची जाळी नाही. रस्त्यावर खड्डे तसेच.                                    *पाणीपट्टी* – १४,००० कोटी ‘कोस्टल रोड’. पण नळाला पाणी नाही. टँकर २००० ला.
*शिक्षण सेस* – १००० मराठी शाळा बंद. पण ‘स्मार्ट सिटी’च्या जाहिराती कोट्यवधींच्या.
*आरोग्य सेस* – ३०० कोटी ‘आपला दवाखाना’ बोर्डावर. पण आत डॉक्टर नाही, औषध नाही.
*स्वच्छता सेस* – ४००० कोटी कचरा उचलायला. पण शीतलादेवी मंदिराजवळच्या इमारतीसमोर डंपिंग.                पैसा ‘दिसणाऱ्या’ गोष्टीवर – पूल, टॉवर, उद्घाटन. पण लोकांच्या ‘जगणाऱ्या’ गोष्टीवर – पाणी, हवा, मॅनहोल साठी – वेळेेवर पैसा नाही.

३. ‘मील’ हरवला, ‘माॅल’ उरला – कारण ‘राजा’ची धोरणंच तशी
घरचा ‘मील’:_ रविवारी एकत्र बसून जेवण. गप्पा, वाद, प्रेम. याला जागा लागते, वेळ लागतो, मन लागतं. _पण घरं ३५० स्क्वेअर फुटाची. मोठा FSI बिल्डरला, रहिवाशाला घुसमट._
‘माॅल’ संस्कृती:_ मैदानं गिळली, बगीचे कागदावर राहिले. पोरांना खेळायला जागाच नाही. _मग ‘राजा’ने पर्याय दिला: AC वाला माॅल. तिथे ५० रुपयाचं पाणी, २०० रुपयांचा पॉपकॉर्न.
‘कर’ कुठे जातोय?_ आपण घरच्या मीलवर ५% GST देता. माॅलमध्ये पिझ्झावर १८% GST देता. _महिन्याला २००० चा ‘खाण्याचा कर’ वेगळा. पण मंडई सुधारायला पैसा नाही, फूटपाथवर भाजीवाल्याला हाकलायला पोलीस आहे._
झाडं का तुटली मुळापासून?_ तर माॅलला जागा लागते. बांधकामाचा राडारोडा झाडाच्या मुळावर. _DP प्लॅनमध्ये ‘गार्डन’ आरक्षित, पण प्रत्यक्षात ‘शॉपिंग’ आरक्षित. कारण झाडं ‘कर’ देत नाहीत, माॅल ‘कट’ देतो.
‘मील’ म्हणजे कुटुंब. ‘माॅल’ म्हणजे बाजार. ‘राजा’ने कुटुंब उध्वस्त करून बाजार मोठा केला. कारण बाजारात ‘हिस्सा’ आहे, घरात नाही.
४. ‘कर’ घेतात, पण ‘काम’ करत नाही – कारण ‘कट’ मिळत नाही.
मॅनहोलवर जाळी:_ ५०० रुपये काम. ‘कट’ किती मिळणार? ५० रुपये? ‘राजा’ला ते परवडत नाही
१७२२ कोटींचा पूल:_ ‘कट’ किती? १७२ कोटी. _म्हणून पूल ‘ताबडतोब’ मंजूर. जाळी ‘निधी नाही’ म्हणून पडून.
‘आपला दवाखाना’:_ बिल्डिंग बांधली की ‘कमीशन’. _डॉक्टर नेमला, औषध घेतलं तर ‘कट’ नाही. म्हणून दवाखाना बंद.
आपला ‘कर’ म्हणजे ‘पगार’. पण हा आपला सेवक पालक काम ‘कट’ मिळेल तिथेच करतो.
५. धनदांडग्यांसाठी कोट्यावधी पण सर्वसामान्यांचे काय?
काँग्रेसचे एड संदेश कोंडविलकर म्हणतात:”वांद्रे वरळी सागरी सेतूवरून वांद्रे किल्ला, बॅण्ड स्टॅन्ड आंतर मार्गासाठी १७२२ कोटी रुपये. वांद्रे ते दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गाचे काय? सागरी सेतू मुळे प्रवासाचा वेळ कमी झाला ही वस्तुस्थिती. वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गाहून मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसरला येण्यासाठी वाहनांना दोन ते अडीच तास लागतात. मग तो रिक्षा, बेस्ट बसेस वा खाजगी वाहन वा रूग्णवाहिका असो.”
मेट्रोचा खेळखंडोबा:_ गुंदवली ते अंधेरी पश्चिम व्हाया दहिसर पूर्व ही थेट मेट्रो होती. _आता गुंदवली ते काशिगाव आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम. दोन मार्गिका.
परिणाम:_ राष्ट्रीय उद्यान ते आनंदनगर फक्त २ स्थानक. _पण दहिसर पूर्वला उतरा, प्लॅटफॉर्म बदला, दुसरी मेट्रो पकडा. २० मिनिटे फुकट.                                                      MMRDA ला विचारलं:_ तर उत्तर काय येतं? तर ‘मार्गिका वेगळ्या’. _अहो, हार्बर लोकल पनवेल ते गोरेगाव, CST ते गोरेगाव एकत्र धावते. मग मेट्रो का नाही?
पश्चिम उपनगरात:_ ३ खासदार, १६ आमदार, १००हून अधिक नगरसेवक. _८० लाख लोकांसाठी निवडून आले. पण ८० लाखांच्या सुखद प्रवासासाठी एक थेट मेट्रो नाही.

सागरी सेतूने ‘वेळ’ वाचला, हे खरं. पण कोणाचा? ज्याच्याकडे गाडी आहे त्याचा. ज्याला लोकल, बस, मेट्रोशिवाय पर्याय नाही, त्याचा ‘वेळ’ अजूनही खड्ड्यातच.

६. सरकारी संस्था विकायला काढल्या, पण बळकट करायला पैसा नाही.
हाफकिन संस्था:_ १२५ वर्षांची. प्लेगपासून कोविडपर्यंत लस बनवली गेली इथेच. _मुंबईच्या आरोग्याची ढाल झाली ही लस.
खासगीकरणाचा डाव:_ आधी ‘एक इंच जमीन दिली नाही’ म्हटलं. _नंतर टाटांना संशोधनासाठी ५ एकर कराराने दिल्याचं उघड झालं.
गरज किती?_ तर त्रिवेणी लस आणि यंत्रांसाठी फक्त _१५० कोटी_. _एवढ्यात संस्था ‘सक्षम’ होते.
पण नजर कुणाची?_ १५०० कोटींच्या मालमत्तेवर खासगी कंपन्यांची. _१५० कोटी द्यायला ‘तिजोरीत खडखडाट’, पण १५०० कोटीची जमीन ‘मित्रा’ला द्यायला वांधा नाही.
<span;>आ.विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत विचारलं: खासगीकरण होणार नाही याची हमी द्या, १५० कोटीचा निधी द्या.
मंत्र्याचं उत्तर आलं:_ खासगीकरण नाही. _पण ‘बैठक घेऊ’चं आश्वासन. म्हणजे ‘नोंद घेतली’चाच दुसरा प्रकार आहे हा.
लस बनवणारी संस्था विकायला काढली, आणि ‘विकास’ म्हणजे माॅल बांधणं. ‘आरोग्य सेस’ घेतात, पण ‘आरोग्य’च विकणार? काहीतरी गडबड आहे.

७. ‘जाब’ विचारणारा नाही – कारण ‘राजा’ गैरहजर
विधानसभा:_ अधिवेशन सुरु आहे. ८ व्या दिवशी काही काळ ‘तहकूब’. _राजा’ वेळेवर हजरच नाही. पावसातल प्रवासात तोही अडकला. मग प्रश्न विचारणार कोण?
मनपा:_ ४ वर्ष ‘प्रशासक राज’. नगरसेवक नव्हताच. _आपल्या वॉर्डला ‘सेवक’च नव्हता. तक्रार करायची कोणाकडे?
१९१६, अॅप:_ “नोंद घेतली”. _तिथं ‘ऐकलं’ जातं पण काम ‘केलं’ जात नाही. कारण ‘भीती’ कशाचीच नाही.

लोकशाहीचा ‘मालक’ कर भरतो, पण ‘नोकर’ पालक लक्ष देत नाही. मग बकालपणा नाही तर काय येणार?

८. ‘कर’ भरणारा ‘मतदार’ विभागला गेला
राजा’ने ‘जाती-धर्म’चा फुगा फुगवला._ आम्ही ‘मराठी-अमराठी’, ‘हिंदू-मुसलमान’ करत बसलोत.
तो ‘मते’ घेऊन खुर्चीवर बसला._ मग ‘बिल्डर’सोबत ‘करा’ची वाटणी केली.
जोपर्यंत ‘कर भरणारा’ एक होत नाही, तोपर्यंत हा ‘राजा’ लुटत राहणार.

९. अजूनही न्यायमूर्तींचा जमीर जिवंत आहे, म्हणून लोकशाही श्वास घेतेय असं म्हणायला जागा आहे.
मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी काय झालं? तर इतिहास घडला.
प्रकरण:_ Socialist Democratic Party of India चे महासचिव सईद अहमद यांनी CAA आणि ज्ञानवापी विरोधात मोर्चे काढले. _मुंबई पोलिसांनी ५ FIR च्या आधारे त्यांना एक वर्षासाठी जिल्हाबंदी केली.
न्या. माधव जामदार संतापले:_ “नागरिकांना भारत सरकारचा गुलाम बनवलं जातंय. ते आंदोलन करू शकत नाहीत, हे काय आहे?”
कोर्टात सुनावलं:_ “‘BJP Government Murdabad’, ‘Amit Shah Murdabad’ असे नारे लावले म्हणून जिल्हाबंदी का? नागरिक असे नारे का लावू शकत नाहीत?”
“पोलीस ,मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे नोकर नाहीत, ते जनतेचे सेवक आहेत. मी तुमच्या अधिकाऱ्यांवर भारी दंड लावीन.”
“लोकांनी विरोध केला तर तुम्ही केस टाकाल, हे काय आहे? नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे.”
वॉशिंग मशीन’वर टिप्पणी:_ “१० वर्षांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आणि विधानसभेत चर्चा काय? Presiding Officer कसा निवडला आणि तो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसा गेला. संपूर्ण महाराष्ट्रात horse-trading सुरू आहे. केस बदलायचा विचार करा, वॉशिंग मशीन आहे.” _न्यायमूर्ती नी जनतेचा संताप व्यक्त केला._
नि काल:_ “सरकारच्या निर्णयाला विरोध करून नारे लावले म्हणून कोणालाही जिल्हाबंदी करता येणार नाही. ही कारवाई दुर्भावनापुर्ण आहे आणि संविधानाच्या अनुच्छेद १९ आणि २१ नुसार मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे.” _म्हणत जिल्हाबंदी आदेश रद्द केला.

आज जिथे असहमतीला देशद्रोह म्हणतात, आंदोलनावर UAPA लावतात, ‘BJP मुर्दाबाद’ म्हटल्यावर जिल्हाबंदी करतात, तिथे एका जजने ठणकावून सांगितलं: नागरिक गुलाम नाहीत. पोलीस पंतप्रधानाचे नोकर नाहीत. विरोध करणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.

जेव्हा न्यायालय जागी होतात, तेव्हाच लोकशाही श्वास घेते._

१०. सत्तेत असताना सोयीची शांतता, सत्तेबाहेर असताना सोयीची भक्ती?                                                          अनेक वर्षे मुंबई मनपात शिवसेना भाजपासोबत सत्तेत होती. तेव्हा:

१अनेक कोटीचे पूल मंजूर झाले, पण ५०० रुपयांची जाळी बसली नाही. का?
२माॅलसाठी DP बदलले, पण मंडईसाठी जागा मिळाली नाही.
३झाडं कापली गेली, FSI वाढवले गेले, मैदानं गायब झाली.    ४हाफकिनची जमीन वाचवायला कोणी रस्त्यावर का आलं नाही.
५दहिसरचा मेट्रोचा खेळखंडोबा का झाला,
तेव्हा ‘विकास’ म्हणजे कंत्राटं होती. ‘हिंदुत्व’ म्हणजे मतं होती. ‘मुंबई’ म्हणजे तिजोरी.
आता सत्ता गेली. मग आठवली रामरक्षा. आठवला हनुमान. आठवलं मारुती मंदिर.
बकालपणा’ थांबवायला ‘हनुमान चालीसा’ लागत नाही. ‘जाब विचारणारा जमीर’ लागतो.
सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असतानाची जबाबदारी सेम आहे. ‘मंदिरा’त रामरक्षा म्हणून मुंबईकरांच्या समस्या सुटणार नाहीत. याला म्हणायचं ‘राजकारण’. पण जनतेला आता ‘राजकारण’ नको, ‘कारण’ हवंय, सुकर जगणं हवय.

११. राम मंदिरातील चोरी विरोधात रामरक्षा आंदोलन – पण ‘कर भरणाऱ्याच्या खिशातली चोरी’ कधी थांबणार? हा प्रश्न सर्व पक्षांना आहे.
उद्धव ठाकरे शनिवारी मारुती मंदिरात रामरक्षा, हनुमान चालीसा म्हणणार. कारण? ‘राम मंदिरातील चोरी’ विरोधात आंदोलन.
चांगलं आहे. चोरीचा निषेध झालाच पाहिजे. रामाच्या दारी चोरी नकोच.
पण एक प्रश्न हा की राम मंदिरात चोरी झाली त्याचा एवढा संताप, मग रोज मुंबईकरांच्या खिशातून ‘कर’ च्या नावाखाली जी ‘चोरी’ होते, त्याचा संताप कधी येणार?_
१७२२कोटींचा पूल ‘चोरी’ नाही का? मॅनहोलची जाळी न बसवता ५ जणांचा जीव जाणे ‘चोरी’, गुन्हा नाही का?
हाफकिनची १५०० कोटीची जमीन खासगी घशात घालण्याचा डाव ‘चोरी’ नाही का?
दहिसरच्या मेट्रो प्रवाशांचे रोज २० मिनिटे चोरणं ‘चोरी’ नाही का?
माॅलसाठी DP बदलून मैदानं, झाडं चोरणं ‘चोरी’ नाही का? झाडं कोसळणं त्यांना जगणं कठीण करणं गुन्हा नाही का?

रामाच्या मूर्तीसमोरचं सोनं चोरीला गेलं, म्हणून रामरक्षा. मान्य!
पण मुंबईकरांच्या नशिबातलं सोनं, म्हणजे पाणी, हवा, रस्ता, वेळ, मैदान, आरोग्य – हे रोज चोरीला जातंय. त्यासाठी ‘करदात्यांची रक्षा’ कधी करणार?
‘देवळातली चोरी’ दिसते. ‘दिल्ली-मुंबई’ कडे जाणारा पैसा, ‘कंत्राट’च्या नावाने होणारी लूट, ‘FSI’ च्या नावाने होणारी दरोडेखोरी – ही चोरी दिसत नाही का?

रामरक्षा म्हणा. जरूर म्हणा. पण आधी सांगा – सत्तेत असताना मुंबई मनपातून जी ‘चोरी’ झाली, त्या ‘चोरां’ना पकडायला कधी रामरक्षा म्हणणार?
कारण जनता आता ‘आरती’वर नाही, ‘हिशोबा’वर मत देणार. आणि ‘प्रसाद’ घेत नाही, ‘पुरावा’ मागते.
हा ‘बकालपणा’ नशिबाचा नाही. हा ‘राजा’ने लिहिलेलं ‘प्राक्तन’ आहे._
नशिब’ बदलायचं असेल तर ‘राजा’ बदलावाच लागेल.
असा ‘सेवक’ असावा जो म्हणेल:
१. “तुम्ही कर भरला, आता प्रत्येक पैशाचा हिशोब माझ्या वेबसाईटवर. महिन्याला रिपोर्ट.”
२. “पहिलं काम – मॅनहोल, पाणी, कचरा, झाड, दहिसर ते अंधेरी थेट मेट्रो, आणि हाफकिनला १५० कोटी. ६ महिन्यात निकाल नाही लागला, तर मी राजीनामा देईन.”
३. “१७२२ कोटींचा पूल नंतर. आधी १७२२ जाळ्या आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर १७ सिग्नल-फ्री जंक्शन. कारण ‘पूल’ पेक्षा ‘प्राण’ महत्त्वाचा.”
४. “हाफकिनसारखी संस्था विकणार नाही. उलट १५० कोटी देऊन ‘लस-स्वातंत्र्य’ मिळवू. कारण ‘आरोग्य’ हा धंदा नाही, ‘हक्क’ आहे.”
५. “आंदोलन करणाऱ्यावर गुन्हे नाही, FIR नाही. कारण विरोध हा देशद्रोह नाही, लोकशाहीचा आत्मा आहे.”
६. “माॅलला परवानगी देताना १०% जागा ‘सार्वजनिक मैदान’ आणि ‘एक मंडई’ याला सक्ती असावी. घरचा ‘मील’ वाचवायचा असेल तर भाजी स्वस्त मिळाली पाहिजे.”
७. “कंत्राटदाराचं बिल ‘काम पूर्ण’ झाल्यावर. ‘कट’ दिल्यावर नाही.”
८. ‘रामरक्षा मंदिरात म्हणेन, पण आधी ‘करदात्याची रक्षा’ मनपात करेन.”

<span;>#सत्यमेवजयते_
<span;>#डरोमतलढो_
<span;>#जयहिंदजयसंविधान_

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here