Home मुख्य बातम्या *दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर १०० बेड रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ;...

*दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर १०० बेड रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ; युवा नेते जय अजितदादा पवार यांची पाहणी व अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करुन घेणेबाबत सुचना…*

42
0

बारामती, दि. २८ जून – दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे उभारण्यात येत असलेल्या १०० बेडच्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या कामाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी भेट देत दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या.

काही महिन्यांपूर्वी ७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तातडीच्या आरोग्यसेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.या महत्त्वाकांक्षी रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

 

यावेळी जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करून विविध बाबींची माहिती घेतली. तसेच रुग्णालयाचे काम उच्च दर्जाचे, वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावे, कामाची कोणतीही त्रुटी खपवून घेणार नाही अशा स्पष्ट सूचना यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या.

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी पाहिलेल्या या आरोग्यसेवेच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी काम वेगाने सुरू असून, हे रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर बारामतीसह परिसरातील ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असुन तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या उच्च उपचारसेवा वाघळवाडी येथेच उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here