Home Trending Now तत्त्वतः सरकार: पेपर फुटतो, महामंडळं अडतात, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित!- शीतल हरीश करदेकर

तत्त्वतः सरकार: पेपर फुटतो, महामंडळं अडतात, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित!- शीतल हरीश करदेकर

89
0

 

*तत्त्वतः सरकार: पेपर फुटतो, महामंडळं अडतात, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित!*
*२०२१ ते २०२६ वचनभंगाची मालिका सुरूच*
*- शीतल करदेकर*
_मुख्य संपादक, मायमीडिया२४_

*२६जून ‘सामाजिक न्याय दिन’. राजर्षी शाहू महाराजांनी ‘कृती’तून बहुजनांच्या पोरांना शाळेत बसवलं. आज त्यांच्याच महाराष्ट्रात ‘तत्त्वतः सरकार’ पोरांना शाळेबाहेर ठेवतंय.*

*२०२१: रंगकर्मी महामंडळाला ‘तत्त्वतः मान्यता’*
९ ऑगस्ट २०२१ दादर. हजारो रंगकर्मी रस्त्यावर. मी स्वतः बातमीदार म्हणून तिथे होते. ‘लोकमत’, ‘वृत्तमानस’ने सर्व वर्तमानपत्रांनी बातमी दिली – ‘महामंडळाला तत्त्वतः मान्यता’.
*४वर्षे झाली. कायदा नाही. महामंडळ नाही.*
कोरोना काळात आम्ही पत्रकारांनी हरीष करदेकर, हरी पाटणकर यांच्यासोबत बॅकस्टेज कामगार, स्पॉट बॉय, डोअरकीपर, बुकिंग क्लार्क यांना ५किलो पीठ, २ किलो तांदूळ, तेल-मसाल्याचं किट वाटलं. *सरकारने ‘महामंडळा’चं किट अजून दिलं नाही.*

*२०२४: पत्रकार महामंडळाला ‘तत्त्वतः मान्यता’*
पत्रकारांच्या पेन्शनसाठी, विम्यासाठी, सुरक्षेसाठी महामंडळ. घोषणा झाली. GR काढू, समिती नेमू – सगळं सांगितलं.
*२ वर्षे झाली. GR नाही. समिती नाही. कायदा नाही.*
म्हणजे रंगकर्मी ४ वर्षे वाट पाहतात, पत्रकार २ वर्षे. *‘तत्त्वतः’ म्हणजे ‘तारीख पे तारीख’.*

*२०२६: ३ दिवसात ३ घोटाळे*
*१. अकरावी प्रवेश:* ७ लाख २ हजार १०विद्यार्थी वंचित. ‘प्रवेश नाही’ हा शब्द २०२६ च्या महाराष्ट्राच्या कपाळावरचा डाग आहे.
*२ NEET पेपरफुटी:* २४लाख विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न टांगणीला. परीक्षा रद्द.
*३ TET पेपरफुटी:* २७ जून. भिवंडीत धाड. प्रश्नपत्रिका सापडली. भावी शिक्षकांची परीक्षा रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले – ‘सूत्रधारांवर मकोका लावू’.

*‘मकोका’ फक्त पेपर फोडणाऱ्यावर नको*
पेपर फोडणं गुन्हा आहे. मकोका लावा. स्वागत आहे.
*पण ४ वर्षे रंगकर्मी महामंडळ अडवणाऱ्या ‘सिस्टम’वर कोणता कायदा? २ वर्षे पत्रकार महामंडळ रखडवणाऱ्या ‘फाईली’वर कोणता गुन्हा? ७लाख पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा ‘सामाजिक गुन्हा’ नाही का?*

*‘तत्त्वतः सरकार’ म्हणजे ‘कृतीशून्य सरकार’.*
*शाहू महाराजांनी ५०% आरक्षणाचा ‘कायदा’ केला. आजचं सरकार फक्त ‘मान्यता’ देतं.*

*‘मायमीडिया२४’चा सरकारला जाहीर अल्टिमेटम*
*पुढच्या ३०दिवसात ५कामं करा, नाहीतर वंचितांचा उद्रेक अटळ आहे:*

१. *TET-NEET:* दोषींना मकोका. १५< दिवसात फेरपरीक्षा. उमेदवारांना प्रवासखर्च + मानसिक त्रास भरपाई.
२. *अकरावी:* ७>६लाख जागा तात्काळ वाढवा. ‘प्रवेश नाही’ हा डाग पुसा.
३. *रंगकर्मी महामंडळ:* २०२१ च्या मान्यतेचा कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करा.
४. *पत्रकार महामंडळ:* GR ८ दिवसात काढा. कायदा ३ महिन्यात करा.
५. *जाहीर माफी:* शिक्षणमंत्री, सांस्कृतिक\\

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here