Home मुंबई *गृहनिर्माण विभागात अप्पर मुख्य सचिवांची तात्काळ कायमस्वरूपी नियुक्ती करावी – झोपडपट्टी मोर्चा,...

*गृहनिर्माण विभागात अप्पर मुख्य सचिवांची तात्काळ कायमस्वरूपी नियुक्ती करावी – झोपडपट्टी मोर्चा, भाजपा मुंबईची मागणी*

40
0

मुंबई, दि. २५ जून : गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी कायमस्वरूपी नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी झोपडपट्टी मोर्चा, भाजपा मुंबईच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री (गृहनिर्माण) डॉ. पंकजजी भोयर* तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांना आज लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गृहनिर्माण विभागातील अप्पर मुख्य सचिव (गृहनिर्माण) पद रिक्त असल्यामुळे म्हाडा, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, झो.पु.प्रा.,धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच राज्यातील विविध गृहनिर्माण व पुनर्विकास योजनांशी संबंधित धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय मंजुरी, न्यायालयीन प्रकरणे आणि प्रलंबित प्रस्तावांवर परिणाम होत असून, निर्णय प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे लाखो झोपडपट्टीवासीय, भाडेकरू, गृहनिर्माण संस्था व पुनर्विकास प्रकल्पांतील नागरिकांना मोठा फटका बसत आहे.

राज्यातील गृहनिर्माण व पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी, प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करण्यासाठी आणि प्रशासनातील निर्णय प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी गृहनिर्माण विभागात अप्पर मुख्य सचिव (गृहनिर्माण) पदावर सक्षम अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी झोपडपट्टी मोर्चा, भाजपा मुंबईने केली आहे.

हे निवेदन झोपडपट्टी मोर्चा, भाजपा मुंबईचे महामंत्री योगेश सुभाष खेमकर यांच्या वतीने आज संबंधित मान्यवरांकडे सादर करण्यात आले असून, राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here