Home Uncategorized AI Data Center हे विकासासाठी आवश्यक असू शकतात, पण विकासाच्या नावाखाली पाण्याचा...

AI Data Center हे विकासासाठी आवश्यक असू शकतात, पण विकासाच्या नावाखाली पाण्याचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही.

60
0

AI Data Center हे विकासासाठी आवश्यक असू शकतात, पण विकासाच्या नावाखाली पाण्याचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही.

AI Data Center मध्ये प्रचंड प्रमाणात गणना (computing) होत असल्याने सर्व्हर सतत गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. प्रश्न Data Center उभारण्याचा नाही, प्रश्न आहे ते पाणी कुठून आणणार याचा!

आज अनेक भागांत नागरिकांना पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नाही, शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत आहेत, भूजलाची पातळी खालावत आहे. अशा परिस्थितीत उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याचं दीर्घकालीन नियोजन काय आहे?- आ. ज्योती गायकवाड

जसं पैशांचं सोंग घेता येत नाही, तसं पाण्याचंही सोंग घेता येत नाही. त्यामुळे AI Data Center उभारण्यापूर्वी त्यांच्या जलवापराचा, पर्यावरणावरील परिणामांचा आणि जनतेच्या पाणीहक्कावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. असे आ . ज्योती गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले

विकास हवा, पण तो जनतेच्या हक्काचं पाणी हिरावून नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here