Home Trending Now महाराष्ट्रातील नवे महाभारत आणि फुलटॉसचे राजकारण* घटनाविरोधी बेकायदेशीर कृत्य की जाणीवपूर्वक षडयंत्र?-शीतल...

महाराष्ट्रातील नवे महाभारत आणि फुलटॉसचे राजकारण* घटनाविरोधी बेकायदेशीर कृत्य की जाणीवपूर्वक षडयंत्र?-शीतल हरीश करदेकर

120
0

 

*महाराष्ट्रातील नवे महाभारत आणि फुलटॉसचे राजकारण*
घटनाविरोधी बेकायदेशीर कृत्य की जाणीवपूर्वक षडयंत्र?*

*शीतल हरीश करदेकर*
*निष्पक्ष पत्रकार महामंडळ, महाराष्ट्र राज्य*

राज्यात सध्या जे सुरू आहे ते राजकारण नाही, ती लोकशाहीची, घटनेची आणि पत्रकारितेची उघड लूट आहे.

*‘शिवसेना संपवणे मिशन’ उघड पडले*
पक्ष फोडला. ४० आमदार पळवले. ६ खासदार गळाला लावले. ECI च्या एका सहीने ५६ वर्षांचे ‘धनुष्यबाण’ हिसकावले. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा वारसाही ओरबाडून घेतला.
आपलं पक्षात पटलं नाही तर बाहेर पडायचं, राजीनामा द्यायचा, नव्या चिन्हावर लढणं ही लोकशाही ठरली असती. पण इथे राजीनामा न देता आमदार पळाले. १०वी अनुसूची पायदळी तुडवली. गुवाहाटी, सुरत, गोवा प्रवास झाला. ‘खरेदी-विक्रीचा संशय’ सुप्रीम कोर्टानेही नोंदवला. तरी FIR नाही, चौकशी नाही, कारवाई नाही.

*‘चाणक्य’ आणि ‘शंका स्थान’*
महाविकास आघाडीतले चाणक्य शरद पवार हे संजय राऊत यांचे गुरू, हे उघड आहे. ‘सामना’तून हल्ले, दिल्लीवाऱ्या, धोरणं – हे चाणक्यांच्या संमतीशिवाय शक्य होतं का? (मूळात या शिवसेना फुटीमागे होत कोण हा अभ्यासाचा विषय आहे.)

पण त्याच पवारांमुळे मविआ कायम ‘शंका स्थान’ राहिलं. २०१९ ला ‘भाजपसोबत जाणार नाही’ शपथ आणि पहाटेचा शपथविधी. २०२२ ला ‘सरकार स्थिर’ म्हणताना सरकार पडलं. २०२३ ला ‘अजितदादांना थांबवलं’ म्हणताना ८ दिवसात अजितदादा उपमुख्यमंत्री झाले.

*‘अंध संजय’ची टिमकी: फुलटॉस की फिक्सिंग?*
संजय राऊतांच्या बेताल वक्तव्यांमुळे शिवसेनेत अस्वस्थता होती. ‘सामना’तून रोज हल्ले होत होते हळुहळू आमदार शिंदेंसोबत गेले., ‘४० गद्दार’, ‘दाढीवाल्यांचा बाप’ – हे राऊतांचे फुलटॉस होते.

*पण आता शिंदे गटाचे आमदारच उघडपणे बोलताहेत:* दीपक केसरकर, संजय शिरसाट सांगतात – संजय राऊतांच्या वागणुकीमुळे आम्ही बाहेर पडलो. अनेकांना उद्धव ठाकरेंना भेटू देत नव्हते. ‘सामना’तून या आमदांवर लिहिलं गेलं. रोज सकाळी बेछूट काहीही बोललं जात होतं.

*म्हणजे यांच्यामुळेच पक्षापासून माणसं दुरावली.ना. एकनाथ शिंदेंनी बंडाचं पहिलं कारण हेच दिलं –

त्याहून गंभीर आहे ‘५० खोके, एकदम ओके’ ही टिमकी वाजवली . *हा आरोप आजतागायत सिद्ध झालेला नाही. ना कोर्टात, ना ED च्या चार्जशीटमध्ये पुरावा आहे. केस सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे, पण निकाल लागलेला नाही. मग जो आरोप सिद्धच झालेला नाही, त्याची टिमकी ‘अंध संजय’ने ‘सगळं माहिती आहे’ या आविर्भावात वारंवार का वाजवली?
आजही खासदारांवर ज्या प्रकारे टीका केली पैशाचे डिल झाल्याचे आकडे सांगितले. ते काय होत?

धृतराष्ट्राच्या संजयकडे ‘दिव्य दृष्टी’ होती. पण आजचा ‘अंध संजय’ पुराव्याशिवाय बोलतो. *जर तुम्हीच आग लावली असेल, तर विझणार कधी हे तुम्हालाच माहित असणार.* म्हणूनच आता संशय बळावतोय – हा केवळ ‘फुलटॉस’ नव्हता, हा ‘मॅच फिक्सिंग’चा भाग होता का? असेही उघडपणे बोललं जातंय.

*या टिमकीचे दोन परिणाम:*
१. *भाजप-शिंदे गटाला ‘व्हिक्टिम कार्ड’ मिळालं.*
२. *मविआची विश्वासार्हता गेली.*

*‘अंध संजया’च्या फुलटॉसने भाजपचाच फायदा झाला. हा ‘राजकीय मुर्खपणा’ होता की ‘जाणीवपूर्वक षडयंत्र’? असे अविश्वासू संजय हद्दपार होणे आवश्यक आहे. अशी पक्षांतर्गत जोरदार चर्चा आहे.

*तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोळ्यावर पट्टी लावून बसले आहेत असे दिसते.*
शिंदे गटाचे आमदार उघडपणे राऊतांवर आरोप करताहेत. ‘सामना’च्या भाषेमुळे पक्ष तुटला हे सांगताहेत. कार्यकर्ते नाराज आहेत. बाळासाहेबांचे जुने सहकारी दुखावले आहेत. *तरीही उद्धव ठाकरे ‘अंध संजया’वरच विसंबून आहेत.?

*या पार्श्वभूमीवर मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय व्यंगचित्रकार
प्रशांत आष्टीकर अनेक विषय प्रखरतेने समोर आणताना दिसत आहेत.*
बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती, हिंदुत्वाचा अर्थ काय, पक्ष का फुटला, ‘अंध संजया’च्या भूमिकेमुळे किती नुकसान झालं – हे आष्टीकर परखडपणे मांडताहेत. *बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे, पण ‘चाटुकारिता’ न करणारे आवाज आजही जिवंत आहेत.*

*‘ आमदारांनी ‘पक्ष सोडून प्रवेश’ केलेला नाही. *त्यांनी 2/3 च्या संख्येच्या जोरावर ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हच बळकावलं.* ECI ने ‘मूळ पक्ष’ ठरवलं. म्हणजे ‘बाहेरून आत आले’ नाहीत – ‘घरच पळवलं’.

पक्षप्रवेश’ म्हणजे इव्हेंट, प्रवेश नाही*
*बाळासाहेबांचे निकटवर्तीय प्रशांत आष्टीकर यांच्या अभ्यासानुसार: “Operation tiger program on 22 june was illegal, because till today 6 mps are belong to ubt on parliamentary board”.
*म्हणजे संसदेच्या अधिकृत रेकॉर्डवर ६ खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच आहेत.* ही वस्तुस्थिती असताना ‘ऑपरेशन टायगर’ करून पक्ष संपवण्याचा डाव बेकायदेशीर ठरतो. पक्षांतर झालेे नाही – हे अधिकृत रेकॉर्डसह सिद्ध आहे.

*फुलटॉस म्हणून ‘नो बॉल’ टाकायचा असतो का?*
राऊतांचा फुलटॉस ‘राजकीय दोष’ असेल, पण पक्षांतरबंदीचा खून – हा ‘घटनात्मक गुन्हा’ आहे. *सुप्रीम कोर्टाने ११ मे २०२३ ला स्पष्ट म्हटलं – ‘राज्यपालांचे वर्तन बेकायदेशीर’, ‘शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशीर’. हे प्रकरणही अजून सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.* तरीही ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवली.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत १०० दिवस तुरुंगात होते. *प्रवीण राऊत देखील या प्रकरणात जेलमध्ये गेला.* १५कोटी ₹ चा खासदारांना मिळाल्याचा आरोप आता केलाय . पण आमदारांना ५० खोके मिळाल्याच्या आरोपावर आजतागायत चौकशी नाही, FIR नाही. मोठ्या रकमेचा आरोप असूनही कारवाई नाही, का?

*न्याय होतो तेव्हा – नरसापूरचे कांबळे प्रकरण*
नरसापूरचा गुन्हेगार कांबळे दोषी. अंतिम निकाल 29 जूनला. खटला ऐतिहासिक ठरला कारण जलदगतीने काम झाले. म्हणजे इच्छा असेल तर न्याय देता येतो. ‘50 खोके’ प्रकरणात इच्छाशक्तीच नाही का?

*राज्याला आरोपी नसलेला, सक्षम गृहमंत्री व मुख्यमंत्री हवा*
महिला अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. ड्रग्ज माफिया का वाढताहेत महाराष्ट्रात? शाळा-कॉलेजबाहेर ड्रग्ज विकले जातात. पुणे, मुंबई, नाशिक – तरुणाई बरबाद होतेय.

*गृहखातं सक्षम हातात हवं.*
ज्याच्यावर ‘वाझे’चे, ‘खंडणी’चे, ‘पोस्टिंग रॅकेट’चे, ‘फोन टॅपिंग’चे आरोप नाहीत. *मुख्यमंत्रीही सक्षम हवा – कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी नसावा, चारित्र्य स्वच्छ हवं. कारण जर
सत्ताधारीच ‘संशयाच्या भोवऱ्यात’ असतील, तेव्हा पोलिस यंत्रणा माफियांवर कारवाई कशी करणार? कितीही मोठ्या घोषणा करा ,नेतृत्व सक्षम हवंच!

*आजच्या ‘नव्या महाभारतात’ खऱ्या संजयाची गरज*
धृतराष्ट्राचा संजय ‘दिव्य दृष्टी’ने सत्य सांगायचा. पण ‘अंध संजय’ पुराव्याशिवाय आरोप करतो. *हा ‘अंध संजय’ फक्त फुलटॉस टाकणारा नाही, तर पक्ष फोडण्याच्या षडयंत्रात सामील असण्याचा संशय बळावतोय.*

जेव्हा पक्षप्रमुखच डोळ्यावर पट्टी लावून बसलेत, तेव्हा बाळासाहेबांचे निकटवर्तीय प्रशांत आष्टीकर यांच्यासारख्यांना पुढे येऊन सत्य सांगावं लागतंय. *म्हणूनच महाराष्ट्राला गरज आहे ‘निष्पक्ष संजया’ची.*

पण सत्तेला मात्र तो ‘निष्पक्ष संजय’ नकोय. म्हणूनच निष्पक्ष पत्रकार महामंडळाची गळचेपी सुरू आहे.

*हा लढा शिवसेना वाचवण्याचा नाही. हा लढा घटना वाचवण्याचा आहे.* आम्ही फुलटॉस टाकणाऱ्या ‘अंध संजया’चीही बाजू घेत नाही, ‘शंका स्थान’ असलेल्या ‘चाणक्या’चीही बाजू घेत नाही, आणि नो बॉल टाकणाऱ्या ‘घटनाद्रोही’ सत्तेचीही बाजू घेत नाही. आम्ही फक्त घटनेची आणि जनतेची बाजू घेतो.

*सत्ताधाऱ्यांनो आणि पक्षप्रमुखांनो, लक्षात ठेवा:*
*एकदा घटनेचा खून करून ‘क्रांती’ केली…परत परत होत नाही!* आज तुम्ही ‘जैसे थे’ ने वाचलात, उद्या तुमच्यावरच तीच वेळ येईल. नियम तोडणारा कधीच ‘विजेता’ नसतो, तो ‘गुन्हेगार’ असतो. ‘अंध संजय’ कधीच ‘हितकर्ता’ नसतो. *आणि डोळ्यावर पट्टी लावून बसणारा पक्षप्रमुख कधीच बाळासाहेबांचा वारसदार नसतो.*

*महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हवा – जो कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी नसेल. तरच ड्रग्ज माफिया संपतील, महिला सुरक्षित होतील, आणि घटना वाचेल.*

*#घटनाद्रोह #नवे_महाभारत #अंध_संजय #षडयंत्र #डोळ्यावर_पट्टी #प्रशांत_आष्टीकर #जैसे_थे #पक्षावर_दरोडा #एकदाच_क्रांती

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here