*झिका व्हायरसची पुण्यात वाढ होत असल्याने शासनाने त्वरित कारवाई करावी- डॉ.नीलम गोऱ्हे*
*मुंबई दि.२९: पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहे. यादृष्टीकोनातून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांना दिल्या आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनास उचित कारवाई करण्याबाबत आदेश दिले जातील व सभागृहाला अवगत केले जाईल असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केले आहे.*






















