भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची घोषणा केली असून, संघात अनेक धक्कादायक आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे,ज्यामुळे तो भारताच्या टी-20 इतिहासातील १५ वा कर्णधार ठरला आहे.
२०२६ चा टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे त्याला या मालिकेसाठी संघातही स्थान देण्यात आलेले नाही. संघ व्यवस्थापनाने आता श्रेयस अय्यरच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवली असून युवा फलंदाज तिलक वर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात युवा खेळाडूंवर विशेष विश्वास दाखवण्यात आला आहे.वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाला प्रथमच भारतीय वरिष्ठ संघात संधी मिळाली आहे.तर प्रिन्स यादव आयपीएल २०२६ मधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर प्रिन्स यादवची संघात निवड झाली आहे.त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही संघात स्थान मिळाले आहे.
२०२७ चा विश्वचषक आणि आगामी कसोटी क्रिकेटचा विचार करता, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.फिरकी विभागात मोठा बदल करत अनुभवी कुलदीप यादवच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ.
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.




















