Home Uncategorized खरेदी घोटाळा: बडा अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यभार काढत

खरेदी घोटाळा: बडा अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात, मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यभार काढत

8
0

आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या विधिमंडळातील आक्रमक भूमिकेनंतर मंत्री पंकजा मुंडेंची मोठी कारवाई

वर्धा : विधिमंडळात उपस्थित प्रश्नावर व लोकप्रतिनिधीच्या रेट्यावर शासनास दखल घ्यावी लागणे अपरिहार्य. आरोप झाले तर त्याची चौकशी करीत दूध का दूध… असा प्रकार अपेक्षित असते. बडा असो वा छोटा अधिकारी, त्यास त्याचे म्हणणे मांडण्याची संधी म्हणजे चौकशी करणे. या प्रकरणात तसेच झाले आहे. भ्रष्टाचारचे आरोप आमदारांनी केले आणि धमाका झाला.

महाराष्ट्र पशुधन मंडळ
नागपूर येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळातील कोट्यवधी रुपयांच्या साहित्य व औषध खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी अखेर सुरू झाली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात विधिमंडळात करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून, दोषारोपाचे ज्ञापन बजावण्यात आल्याचे अधिकृत पत्र जारी केले आहे. या कारवाईमुळे पशुसंवर्धन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या माध्यमातून राज्यातील साधारणतः ४५०० पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी कृत्रिम रेतन आणि इतर उपचारांचे साहित्य खरेदी केले जाते.

अतिरिक्त कार्यभार असतांनाच
मे २०२३ मध्ये प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सतीश राजू यांनी या मंडळाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. कार्यभार हाती घेताच त्यांनी राज्य शासनाचे खरेदी धोरण आणि ‘जेम’ (GeM) पोर्टलवरील अनिवार्य नोंदणीचे नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांच्या साहित्य खरेदीचा सपाटा लावला. या घोटाळ्याचे मुख्य केंद्र डॉ. राजू यांचे मित्र आशिष सोनकुसरे यांची ‘ई-व्हर्स ए.आय. प्रायव्हेट लिमिटेड’ ही नागपूरची सॉफ्टवेअर कंपनी ठरली. कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबवता, केवळ १ लाख रुपयात होणाऱ्या सॉफ्टवेअरच्या कामांचे १०-१० लाखांचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने या कंपनीला देण्यात आले. याशिवाय, ‘काऊ कॉलर टॅग’ आणि ‘महाराष्ट्र मिथेन मिशन’ यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या नावाखाली लाखो रुपयांचे कंत्राट सोनकुसरे यांच्या कंपनीला देण्याचा घाट घातला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here