Home Trending Now *हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५*मुंबईतील नामांकित आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा...

*हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५*मुंबईतील नामांकित आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव सोहळा…

28
0

गणेशोत्सव जागतीक मंचावर!

‘गणेशोत्सव’ हा केवळ एक सण नाही, तर ती महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि अथांग जनशक्तीचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिलेल्या या उत्सवाने नेहमीच समाजाला एकसंघ बांधण्याचे जनमन जागृतीचे व चळवळीचे काम केले आहे.
याच परंपरेला सन्मानित करत, गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने या पवित्र उत्सवाला *’महाराष्ट्र राज्य महोत्सव’* म्हणून घोषित केले. हा ऐतिहासिक निर्णय आपल्या सांस्कृतिक वैभवावर मानाचा तुरा रोवणारा ठरला!

याच ऐतिहासिक निर्णयाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा डंका जागतिक स्तरावर वाजवण्यासाठी *’टेकेरियस डेव्हलपमेंट’* प्रस्तुत आणि *’ब्रँड्स मेकर’* आयोजित
*’हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५’* हा दैदिप्यमान सोहळा
*मुंबईचा गणेशोत्सव* आणि *माई मिडिया २४* यांच्या सहकार्याने १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता यशवंत राव चव्हाण सेंटर मंत्रालय समोर, मुंबई येथे संपन्न होत आहे.

*मुंबई आणि परिसरातील अहोरात्र झटणाऱ्या, सामाजिक भान जपणाऱ्या, पर्यावरणपुरकतेला प्राधान्य देणाऱ्या आणि कलेचा अद्भुत अविष्कार घडवणाऱ्या नामांकित गणेशोत्सव मंडळांच्या निष्ठेला आणि अथांग कार्याला अधिकृतपणे मानवंदना देण्याचे हे एक प्रामाणिक आणि भव्य आयोजन आहे.*

अधिक माहितीसाठी संपर्क
९१३६१३६१५२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here