Home Uncategorized *कोकणाचे हित हाच ध्यास”!* .फक्त इच्छाशक्ती बळकट हवी! *फक्त पर्यटनावर कोकण समृद्ध...

*कोकणाचे हित हाच ध्यास”!* .फक्त इच्छाशक्ती बळकट हवी! *फक्त पर्यटनावर कोकण समृद्ध होऊ शकतं – *पण मग अडतं कुठे?* – शीतल हरीश करदेकर

115
0

. *कोकणाचे हित हाच ध्यास”!* .फक्त इच्छाशक्ती  बळकट हवी!
*फक्त पर्यटनावर कोकण समृद्ध होऊ शकतं –
*पण मग अडतं कुठे?*
– शीतल हरीश करदेकर

*कोकणाकडे सगळं आहे. फक्त पोहोचायचा रस्ता नाही.
‘साधी भोळी माणसं’पर्यटनातून श्रीमंत होऊ शकतात.
सरकार हो,फक्त ‘शहाळं’ विकण्यापुरतं कोकण ठेवू नका. ‘शहाळ्याची बाग’ जगाला दाखवा.
सांस्कृतिक वारसा आहे.
“कोकणाचे हित हाच ध्यास”! हे २ च शब्द , पण त्यात अख्खा कोकण सामावला आहे.
समजुन घ्या’हित’ कसलं तर कोकणचं भलं, विकास, हक्क, सुविधा हे सगळं व्हावं, मिळावं
आणि तो मिळवण्याची जिद्द, वेड, धग. हाच आमचा ध्यास आहे.
आणि या विचारातून आजच्या लेखाचे शीर्षक तयार झाले.”‘हित -ध्यास’ – कोकणचा एक आवाज!”
●आता आपण मूूळ विषयाकडे येतोय….
“कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी”…हे गाणं हे वास्तव आहे.किती भांडली, तकतक केली तरी वरुन रफ दिसणारी ही माणसं मायाळू! कोकणाच्या गर्भात शहाळ्याच्या पाण्याचा गोडवा आणि निसर्गाची नितळता आहे. प्रतिकारक क्षमता आहे.

*आता झालं न लॉकशीर्षक? : “हित ध्यास हा कोकणचा एक आवाज” आज एक संदेश देतोय इथल्या लोकप्रतिनिधींना व कोकणवासीयांना! आमच्याकडे नारळाची धार + गोडवा आहे.
आता हाच कोकणचा जाहीरनामा आहे.-हित ध्यास!

‘कोकम सरबत’ आणि ‘सोलकढी’ शिवाय कोकणचा ‘गोडवा’ अपूर्णच.
चिंच पाहुणी, कोकम घरचा – ही ओळ तर कोकणची DNA आहे.
शहाळ्याची धार आणि गोडवा हा कोकणचा दुहेरी आवाज आहे.
*या शहाळ्याला दोन बाजू आहेत – एक धार, दुसरा गोडवा.*
फक्त पर्यटनावर कोकण समृद्ध होऊ शकतं – जर सरकारने फक्त ३गोष्टी केल्या तर.*

कोकण हा भारताचा बाली/थायलंड होऊ शकतो. कसा? बघा ..
कोकणाकडे काय आहे?जगात त्याची किंमत काय? तर
७२० किमी समुद्रकिनारा हा गोव्यापेक्षा ७ पट मोठा. मालदीवपेक्षा स्वच्छ
हापूस, काजू, कोकम ने जागतिक ब्रँड. GI टॅग मिळालाय
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांंना ४००वर्षांचा इतिहास आहे . युनेस्को लायक आहे हे.
इथे धबधबे वॉटरफॉल, बॅकवॉटर, हॉट स्प्रिंग…केरळपेक्षा वैविध्य जास्त आहे.
जैवविविधता, कातळशिल्प पक्षी अभयारण्य,स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन सफारी शक्य आहे.
गणपतीपुळे, हरिहरेश्वर ला तर धार्मिक + समुद्रकिनारा असा कॉम्बो पॅक आहे तो इतर कुठेच नाही
गोवा आहे फक्त १०५ किमी किनाऱ्यावर वर्षाला ₹१५,०००कोटी कमावतो.
तर कोकणचा किनारा ७ पट आहे. हिशोब करा नि लक्षात घ्या ₹१लाख कोटीचं पर्यटन एकटं कोकण करू शकतं!
●मग अडतंय कुठं?

●१. *NH-66 चा मोठा खड्डा आहे – मुंबईहून गणपतीपुळ्याला जायला १० तास लागतात मग पर्यटक कंटाळून गोव्याला जातात.
२. कोकण रेल्वे एकेरी आहे. तिचीही तिकीटं मिळत नाहीत मिळालं तरी १२ तास लागतात. नीट थांबेही नाहीत.
३. ST इथे खटारा: तारकर्ली, देवबागला जायला शेवटचा माईल कनेक्टिव्हिटी नाही.
४. जाहिरात शून्यता: ‘अतुल्य भारत’ मध्ये केरळ, राजस्थान दिसतंय पण तितकं कोकण वैशिष्ट्यांसह दिसत नाही.म्हणजे कोकणाकडे सगळं आहे. फक्त पोहोचायचा मार्ग नाही.

● *कोकणाचं प्राधान्य काय तर मोठ्या MIDC नको, रिफायनरी नको, प्रदूषण नको. फक्त ४पदरी रस्ता द्या, रेल्वे दुपदरी करा, एस टी सुधारा. मग बघा हापूस विकून, मासे विकून, होम-स्टे चालवून कोकणाचा पोरगा मुंबईला नोकरीला जाणार नाही.
गोवा १ लाख परदेशी पर्यटक आणतो. कोकण १० लाख आणू शकतं.* *कारण आमच्याकडे समुद्र आहे, डोंगर आहे, संस्कृती आहे. फक्त सरकारची इच्छाशक्ती नाही.*

● ही मागण्याची धार कशासाठी? तर आहे हक्कासाठी.
एस टी महामंडळ : खेड-नांदेड बस रोज ₹५०,००० कमावते. तिला खटारा गाडी का म्हणतात? याचा जाब विचारलाच पाहिजे. अधिकाऱ्यांना.
●कोकण रेल्वे :२६ वर्षांत १४७ किमी दुहेरीकरण झालं नाही. इथून जाणार्‍या ८०% गाड्या केरळच्या आहेत. हा दुजाभाव का? तो आता तर सहन होणारा नाही!
●NH-66 :* २००९ पासून ४ पदरी रस्ता रखडलाय. काही डेडलाईन हवीच की नाही? असं व्यक्त झाल्यावर ही आक्रमकता आहे असं बोललं जाईल. पण हा द्वेष नाही. हा हक्काचा जाब विचारतो आहे कोकण!

●२. इथे गोडवा आवश्यक कशासाठी आहे ? तो पर्यटनासाठी. ‘अतिथी देवो भव’ म्हणत जगाला कोकणाकडे बोलवण्यासाठी.
काय नाही इथे…
इथे सर्वत्र खच्चूून भरलाय निसर्गाचा गोडवा :
*लाल माती, बैठी घरं, लाल चिरा दगडाच्या भिंती, ७२० किमी समुद्रकिनारा, केवडा-बकुळीचा सुगंध.

●पोटाचा गोडवा तर ओत-प्रोत आहे.
खोबऱ्याची खपटी, रानातली बोरं, अलिबागचे सफेद कांदे, कडव्या वालाचं बिरडं.
कैरीचं पन्हं, कैरीचं सार, चुलीवरची तांदळाची भाकरी, खरपूस धिरडी. मटन-वडे
कोकम सरबत तर उन्हाळ्यातलं अमृत, कोकणचं खरं कोल्ड्रिंक
सोलकढी – नारळाच्या दुधातली, गुलाबी. जेवणानंतरची निसर्ग शांतता.*
विदर्भात चिंच, कोकणात कोकम. चिंच पाहुणी, कोकम घरचा.
●श्रद्धेचा गोडवा तर सर्वत्र भरुन राहिलाय.
*पांडवकालिन मंदिरं, गावोगावची शिव मंदिरं,
गणपतीचा सण तर नात्यागोत्यानी भरलेला. चाकरमानी प्रचंड ओढीने गावी का येतात हा खूप मोठ्ठा विषय.चिंचोळं लाल भडक कुंकू, चिंचोका-गुंजेची माळ.असं खूप भरभरुन लिहिता येईल.

●*इथूूनगोवा १०५ किमीवर ते राज्य वर्षाला ₹१५,००० कोटी कमावते.
तर कोकण ₹१ लाख कोटी कमवू शकतो.
आता कसा?तर इथल्या तरुणाई ला इथेच काम मिळावं. तरिही फक्त ३ गोष्टी द्यायला हव्यातच
१. चिंचोळ्या कुंकवासारखी टोकदार कामं– ४ पदरी रस्ता, दुहेरी रेल्वे, सुस्थितीत एस टी
२. चिंचोका-गुंजेसारखी साधी नितळ श्रीमंती आहे – कोकम सरबत, सोलकढी, अस्सल कोकणी जेवण. मासे वडे सागुती.
३. केवडा-बकुळीसारखा सुगंध – मंदिरं, किल्ले, निसर्ग वाचवून टिकाऊ पर्यटन.
हे कठीण नाही. पण इच्छाशक्ती हवी बक्कळ!

●६४ वर्ष कोकणाने महाराष्ट्राला खूप दिलं .पण महाराष्ट्राने कोकणाला तुलनेने कमीच दिलं.आता अधिक खुर्चीच राजकारण नको. कोकणाला फक्त ‘मुख्य सुविधा’ द्या!
*मग कोकणचा पोरगा मुंबईला जाणार नाही. जग कोकणात येईल , मासे खायला ,सोलकढी प्यायला, कोकम सरबत घ्यायला, मंदिरांत नतमस्तक व्हायला.समुद्र किनारा ओला निसर्ग. पहायला…
●लाल दगडाची भिंत – तोडायला जाल तर हात फुटतील.
बैठ्या घराचं दार उघडलं की सोलकढीचा पेला देऊन पोटभर जेवू घालू.
इथे शहाळं फोडायची धमकी नाही तर शहाळं वाटायचं आमंत्रण आहे.
पण ते वाटायच्या आधी इथल्या वाट्याचं शहाळं मिळालंच पाहिजे..कारण शेवटी एकच सत्य आहे की कोकण चं हित हाच आपला ध्यास असावा!

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here