Home मुंबई *सर्वधर्म समभावाचा कस : टँकरपासून शेडपर्यंत, आणि २०४७ च्या विकसित भारतासाठी सुधारणांच्या...

*सर्वधर्म समभावाचा कस : टँकरपासून शेडपर्यंत, आणि २०४७ च्या विकसित भारतासाठी सुधारणांच्या दारापर्यंत*

11
0

*दैनिक द ग्लोबल टाइम्स*
*गुरुवार दि.२८मे २०२६*
*अग्रलेख:शीतल हरीश करदेकर,कार्यकारी संपादक*

*सर्वधर्म समभावाचा कस : टँकरपासून शेडपर्यंत, आणि २०४७ च्या विकसित भारतासाठी सुधारणांच्या दारापर्यंत*

*मान्सूनच्या उंबरठ्यावर महाराष्ट्राची दोन टोकं एकाच वेळी दिसत आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील बळीराजा आणि कुटुंबिय पाण्याच्या आणि डिझेलच्या थेंबासाठी भटकताहेत, तर दुसरीकडे महानगरांमधील सोसायट्यांत बकरी ईदच्या शेडवरून सामाजिक सलोखा पणाला लागलाय.*

*मे महिन्यातील अवकाळीने कांदा, द्राक्ष उद्ध्वस्त केली. सुदैवाने सरकारने २४१० रु. दराने कांदा खरेदीचा निर्णय घेतला. पण ३ लाख टनची *मर्यादा आणि प्रतवारीच्या अटींमुळे हजारो शेतकरी अजूनही १२००-१८०० च्या भावातच कांदा विकत आहेत. दुष्काळी भागात टँकर ३२०० पार गेलेत आणि डिझेलसाठी शेतकरी १५०० किमी भटकतोय. तरीही कॅनवाल्यांना साठेबाज म्हणून ठप्पा मारणारे मंत्री महान म्हणावे लागतील.*

● *ग्रामीण भागात आता बळीप्रथा जवळपास इतिहासजमा झालीय.तुळजापूर, कोल्हापूरच्या देवीसमोर रेडा-बकरी कापणं कायद्याने आणि प्रबोधनाने बंद झालंय. खेड्यात श्रद्धा आहे, पण वाद नाही.*
*पण शहरी भारतात ‘श्रद्धा विरुद्ध व्यवस्था’ असा नवा संघर्ष उभा आहे. आज-उद्या २७ आणि २८ मे रोजी बकरी ईद साजरी होत असताना, सोसायटीत शेड* *उभारण्यावरून वाद, तक्रारी, पोलिसांच्या नोटिसा येत आहेत. दाटीवाटीच्या फ्लॅट *संस्कृतीत जागेची कमतरता, स्वच्छतेचा प्रश्न आणि कायद्याची भीती आहेत म्हणूनच हे सगळे बळीचे वाद सध्या शहरातच केंद्रित झालेत.*
*आणि म्हणूनच*
●*येथेच ‘सर्वधर्म समभावा’चा खरा कस लागतो.*गणेशोत्सव, नवरात्र यासाठी महापालिका*२महिने आधी तयारी करते.*मंडप परवानगी, विसर्जन घाट, पोलीस बंदोबस्त. सर्व ‘सार्वजनिक उत्सव’ म्हणून. पण बकरी ईद आली की ती ‘खाजगी कृती’ ठरवून प्रशासन हात वर करते.* *मुंबईत फक्त १२ सामाईक कुर्बानी केंद्र! मग शहरातील नागरिकांनी जायचं कुठे? हा प्रश्न आहेच.*
*सर्वधर्म समभावाचा अर्थ सर्वासाठी श्रद्धा ही समान, नागरिकत्वही एकच. मग* *शहरी नियोजनात दुजाभाव असता कामा नये हा साधा विषय आहे. इथे राजकारण होता कामा नये.*
*आणि यापुढचा, अधिक महत्वाचा प्रश्न आहे की,* ●*श्रद्धा जपताना क्रूरतेचा हिंसेचा त्याग करता येईल का?*
*बकरी ईद हजरत इब्राहिम यांच्या अल्लाहवरील निस्सीम श्रद्धेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. कुराणही सांगतं: ‘अल्लाहला तुमचं मांस किंवा रक्त पोहोचत नाही, तर तुमची ईश्वरनिष्ठा पोहोचते’. मग २१ व्या शतकात, दाटीवाटीच्या शहरात ‘प्रत्यक्ष कुर्बानी’ हाच एकमेव मार्ग आहे का?*
●*जग बदलतंय. ट्युनिशिया, मोरोक्को सारख्या मुस्लिम देशांनी ‘सामाईक कत्तलखान्यातच कुर्बानी’ बंधनकारक केलीय.* *भारतातही अनेक सुशिक्षित मुस्लिम कुटुंबं आता ‘प्रत्यक्ष कुर्बानी’ ऐवजी तेवढी रक्कम गरीबांना दान करतात किंवा NGO मार्फत मांस वाटप करतात. दाऊदी बोहरा समाजात तर केक कापून ‘त्याग’ साजरा करण्याची प्रथा सुरू झालीय.*

*सर्वोच्च न्यायालय ही स्पष्ट सांगतं, ‘धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ प्राण्यांना क्रूरतेने मारण्याची परवानगी नाही’.*
*म्हणूनच वेळ आली आहे ‘सुधारणेच्या’ दिशेने पाऊल टाकण्याची. सतीप्रथा, बालविवाह, त्रिवार तलाक कायद्याने बंद झाले कारण समाजाने मागणी केली. तशीच मागणी आता ‘रक्तरंजित कुर्बानी’ ऐवजी ‘प्रतीकात्मक त्यागा’साठी व्हायला हवीय.*
*’सुधारणा’ ही फक्त एका धर्माची जबाबदारी नाही, तर ती सर्व धर्मांची आहे.* *काळानुरूप बदल आवश्यकच आहे. तरच आपला धर्म आणि समाज प्रगत, सुधारक होतो. याचे भान सर्वांनाच आले तर धर्माच्या नावाने राजकारण होणार नाही. मग नुसता ‘भाईचारा’ नव्हे, तर संवेदनशीलता आणि एकमेकांतील सामंजस्य वाढेल.कारण भाईचारा कधी कधी वरवरचा असतो, पण संवेदनशीलता मनातून येते.*

●*हिंदू समाजानेही शतकानुशतके चालत आलेली रेडे-बकऱ्यांची बळीप्रथा कायद्याने आणि प्रबोधनाने बंद केली. कारण ‘धर्म’ म्हणजे ‘काळानुसार चांगले तेवढे घेणे’ आणि ‘वाईट टाकणे’ असते. चांगले ते धरुन पुढे जाणे याचाच अर्थ धर्म!*
*मग आज शहरातील मुस्लिम समाजानेही ‘रक्तरंजित कुर्बानी’ ऐवजी ‘प्रतीकात्मक त्यागा’चा मार्ग स्वीकारला तर बिघडलं कुठे? सर्वधर्म समभावाचा अर्थ ‘सर्वांनी वाईट प्रथाच जपाव्यात’ असा नाही, तर ‘सर्वांनी चांगल्या सुधारणा स्वीकाराव्यात’ असा आहे.*

●*प्रशासनानेही दुहेरी भूमिका घ्यावी:*
*१. गणपती मंडपाप्रमाणे प्रत्येक प्रभागात ‘एक खिडकी’ पद्धतीने परवानाधारक कुर्बानी केंद्र उभारावीत. मग शहरातील सोसायटीतील वाद मिटतील.*
*२. दीर्घकालीन उपाय – ‘प्राणी क्रूरता नको’ आणि ‘धार्मिक स्वातंत्र्य’ यांचा समतोल साधण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, प्राणीमित्र संघटना, कायदेतज्ज्ञ यांची संयुक्त समिती नेमून ‘प्रतीकात्मक कुर्बानी’ ला प्रोत्साहन द्यावं.*
*सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,विकसित भारत २०४७ घडवायचा असेल तर ‘सर्वधर्म समभाव’ फक्त घोषणेत नको, तर शहरी नियोजनात आणि सुधारणेत दिसायला हवा. सुधारणा व प्रगती सर्वांची होण्यासाठी मानसिक प्रगती, अभ्यास आणि सुधारणावादी पाऊल हीच खरी गुरुकिल्ली आहे.*
*खेड्यातील टँकर, शहरातील शेड आणि सर्व धर्मातील कालबाह्य प्रथा या तिन्ही दुभंगलेल्या दऱ्या बुजवल्याशिवाय भारत एकसंध होणार नाही.यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.*
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here