Home मुंबई *समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पोलीस विद्यार्थ्यांकडून पुण्यात पार पडला कृतज्ञता सोहळा...

*समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व पोलीस विद्यार्थ्यांकडून पुण्यात पार पडला कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद

14
0

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाखो स्पर्धा परीक्षार्थिंचे शेकडो महत्वाचे विषय मार्गी लागल्यामुळे शनिवार,दि. २३/०५/२०२६ रोजी समस्त स्पर्धा परीक्षा व पोलीस विद्यार्थ्यांच्या वतीने पुणे येथे कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी संवाद हा कार्यक्रम पार पाडला गेला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर असणारे लोकप्रतिनिधी व मंत्री यांना विशेष निमंत्रित करून त्यांचे कृतज्ञ व्यक्त केले. सदर अतिथी मध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे व आमदार बच्चु कडू उपस्थित होते. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार होते, परंतु, तांत्रिक कारणास्तव ते कार्यक्रमास पोहचू शकले नाही.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्र गीताने झाली.उद्धव ढवळे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून मान्यवरांनीं केलेल्या कामाचा पाढा वाचला. त्यात सर्व परीक्षा mpsc कडे दिल्याबद्दल, पेपरफुटी विरोधातील कठोर कायदा पारित केल्याबद्दल, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचे एकात्मिक धोरण ठरविल्याबद्दल, बंद पडलेली पोलीस अंमलदारांची खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पुन्हा चालू केल्याबद्दल व एकनाथ जी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हजारो पदांची मेघाभरती घेतल्याबद्दल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे व एकनाथ जी शिंदे साहेबांचे आभार मानले. वरील महत्वाचे ऐतिहासिक निर्णय होण्यामागे एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना नेमलेल्या समित्या आणि उपरोक्त मान्यवरांनीं केलेला पाठपुरावा कारणीभूत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आमदार बच्चु कडू यांच्या भाषणातून गेली१० वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खासगी कंपनी द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा mpsc कडे देण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दिसून आला. पुणे, संभाजीनगर व नागपूरला आंदोलन करून ही विषय मार्गी लागत नव्हते, म्हणून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद झाले आणि त्याची शिक्षा ही त्यांना झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या भाषणातून त्यांनी व्यक्त केली कीं एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळेच हे सकारात्मक निर्णय शक्य झाले.महेश बडे व उद्धव ढवळे ह्या विद्यार्थी प्रतिनिधी द्वारे आलेल्या प्रश्नांवर त्यांनी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कडे निवेदन दिले, तात्काळ शिंदे साहेबांनी समित्या नेमल्या व पुढील पाठपुरावा आपण केला. भविष्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात एखादी समन्वय यंत्रणा असावी अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले कीं स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सरकार यांच्या बैठका आयोजित केल्या. विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिवेशनात तर घेतलेच जावे, पण अधिवेशनापूर्वी देखील १५ दिवसाच्या पूर्व कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकी लावून मार्गी लावले पाहिजे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या भाषणातून त्यांनी व्यक्त केले कीं गृहराज्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी पोलीस विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले.आमदार बच्चु कडू यांच्याद्वारे आलेल्या निवेदनानुसार तरुण पोलीस अंमलदार खत्यांअंतर्गत फौजदार झाल्यावर पोलीस प्रशासनास देखील फायदा आहे, हे समजून आपण स्वतंत्र OSD ह्या विषयावर पाठपुरावा करण्यासाठी नियुक्त केला व १ सप्टेंबर च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील परीक्षार्थी पोलीस अंमलदार यांना न्याय दिला.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थी संवादातून प्राप्त झालेले सर्व प्रश्न आपल्या भाषणावेळी वाचून दाखविले. प्रत्येक प्रश्नांत आपण विद्यार्थ्यांसोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लवकरच नगरपरिषद विभागाची ५००० पदांची भरती प्रक्रिया चालू करण्याचे आश्वासन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. मागच्या काळात जरी त्यांच्या मुळे २४ तासात काही प्रश्न सुटले असले तरी त्या साठी केवळ एकनाथजी शिंदे साहेब कारणीभूत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणारे विद्यार्थीप्रतिनिधी उद्धव ढवळे, महेश बडे, किरण निंभोरे व रुपेश आमले यांचे कौतुक देखील त्यांनी केले. त्यांचा उपस्थित विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद झाला. त्यांनी विदयार्थ्यांना आश्वस्त केले कीं दर महिन्याला आपण स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम करू. त्यासाठी शासनस्तरावरून तशी एखादी यंत्रणा तयार करण्याबाबतची घोषणा ही त्यांनी केली.
सदर कृतज्ञता सोहळ्यात हजारोच्या संख्येने स्पर्धापरीक्षा विद्यार्थी हजर होते.
आपली बंद पडलेली परीक्षा पुन्हा चालू झाल्यामुळे ऋण व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातून मोठया संख्येने पोलीस अंमलदार वर्ग देखील उपस्थित होता. विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त केली.सदर कार्यक्रम LIVE प्रक्षेपीत असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी कृतज्ञ व्यक्त करून आपल्या काही प्रलंबित समस्या देखील मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश आमले व किरण निंभोरे यांनी केले व आभार प्रदर्शन महेश बडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here