Home मुंबई *लेखक संवेदनशील असतो, दगडाच्या काळजाचा नसतो*

*लेखक संवेदनशील असतो, दगडाच्या काळजाचा नसतो*

15
0

*माटुंग्यातील कार्यक्रमात भाजपा गटनेते आ. दरेकरांचे वक्तव्य*

मुंबई – लेखक हा संवेदनशील असतो, कुठलाच लेखक दगडाच्या काळजाचा नसतो. ज्याला संवेदना आणि मन असते तो लिखाण करू शकतो, असे वक्तव्य भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी माटुंगा येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केले.

बोधगया प्रोडक्शन व ऍड सॅफ्रॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पॉप्युलर प्रकाशन यांच्या सहकार्याने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत बहुचर्चित अशा ‘खांद्यावरचे स्टार्स’ या पुस्तकाचे लेखक व मुंबई पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांचा शनिवारी यशवंत नाट्य मंदिराचे जयश्री व जयंत साळगावकर सभागृह येथे वाचकांशी थेट संवाद आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अस्मिता मोहिते, कुणाल रेगे, श्वेता परुळकर यांसह मोठ्या संख्येने लेखक व वाचक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, या कार्यक्रमात राजकीय नेत्यापेक्षा मी ही एक लेखक असल्याने आवर्जून उपस्थित आहे. मंत्रमुग्ध होऊन सर्वांची भाषणे ऐकली. महाविद्यालयीन जीवनात असताना ‘भटकंती’ नावाचे पुस्तक मी लिहिले होते. आता सहकारी महाराष्ट्र नावाचे मुखपत्र सुरू केले आहे. पोलिसांविषयी प्रचंड संवेदना मला आहेत. बोलून, भाषण करून नाही तर मी कृतीतून काम करत असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पोलिसांना आयुष्यात कधीच बजेट मिळाले नव्हते एवढा पोलीस खात्याला बजेट देवाभाऊंच्या राज्यात मिळतो आहे. राज्यकर्ता जर संवेदनशील असेल तर यंत्रणा संवेदनशील होते. एक अधिकारी काय करू शकतो याची अधिक उदाहरणे आहेत, परंतु ते पुस्तक रूपात जर आले तर शेकडो राजमाने तयार होऊ शकतात. एक राजमाने व्यवस्था बदलू शकत नाही. असे शंभर-हजारो राजमाने समाजात निर्माण होतील तेव्हा आपल्याला समाज सुदृढ व त्याला चांगली दिशा देता येईल, असेही दरेकर म्हणाले.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here