Home मुंबई *परिचारिकांंचे ३ दिवसीय धरणे आंदोलन तुर्तास स्थगित!*

*परिचारिकांंचे ३ दिवसीय धरणे आंदोलन तुर्तास स्थगित!*

28
0

ना. प्रकाश अबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांची महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना, मुख्यालय लातूर यांचे पदाधिकारी अरुण कदम – कार्याध्यक्ष,सुमित्रा तोटे- सरचिटणीस,
भिमराव चक्रे – उपाध्यक्ष, सुनिल कुंटे, सुकुमार गुडे- सहसचिव, दत्ता ऐवले- कार्यकारिणी सदस्य.
यांनी
भेट घेऊन, सार्वजनिक आरोग्य विभागांतील परिचारीकांच्या प्रशासकीय बदलीबाबत चर्चा केली. प्रशासकीय बदलीसंदर्भात लवकरच विस्तृत बैठक मंत्री महोदयांसोबत होईलच, तत्पुर्वी ज्या कुठल्या परिमंडळात प्रशासकीय बदली समुपदेशनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला असल्यास ३० दिवसांच्या आत लिखित स्वरुपात शासनास कळविण्यासाठी आवाहन केले.
तसेच सायंकाळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक मा. डॉ. पल्लवी सापळे मॅडम यांच्या सोबतही या प्रतीनिधींनी परिचारिकांना प्रशासकीय बदलीतून वगळून फक्त विनंती व तक्रार आधारित बदली करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याबाबत योग्य निर्णय घेऊ असे संचालक यांनी सांगितले.
तसेच दि. २१/०५/२९२६ रोजी मुख्य सचिव यांच्यासोबत सायं ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याने ३दिवसीय धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून, बैठकीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here