Home मुंबई प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम रंग दिला जातोय- वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया!

प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम रंग दिला जातोय- वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया!

27
0

गेल्या काही वर्षांपासून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकावरील अवैध झोपडपट्टी हटवण्यासाठी कोर्टात खटला सुरु होता. याचा निकाल लागताच पोलिस बल तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई सुरू करण्यात आली यावेळी पोलीस तसेच स्थानिकांमध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर शिवसेना (उबाठा) नेते वरुण सरदेसाई यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली.
आ.वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ‘भाजपकडून जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय वाईट प्रकार करण्यात आला’ असे म्हटले .
त्यांनी, “आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तेथे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लीम नरेटीव्ह तयार करायचा ही भाजपची जुनी स्टॅटर्जी आहे. तोच परत एकदा प्रयत्न केला गेलाय.
जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडून करण्यात आला” असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here