Home मुंबई *जव्हारचे माजी नगराध्यक्ष संदीप रवींद्र वैद्य यांचे देहावसान , वयाच्या ६० व्या...

*जव्हारचे माजी नगराध्यक्ष संदीप रवींद्र वैद्य यांचे देहावसान , वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*

46
0

मुंबई,
*महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि जव्हारचे माजी नगराध्यक्ष संदीप रवींद्र वैद्य यांचे गुरुवारी पहाटे ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने जव्हार येथे दुःखद निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी माधवी, कन्या समृद्धी आणि सुपुत्र संजीत असा परिवार आहे. काल सकाळी जव्हारच्या विकासकामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन संदीप रवींद्र वैद्य हे तातडीने जव्हार येथे रवाना झाले. परंतु आज पहाटे अडीच वाजता त्यांचे अचानक ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव ठाणे येथील निवासस्थानी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. सायंकाळी ठाणे येथील हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चिरंजीव संजीत संदीप वैद्य यांनी मंत्राग्नी दिला. यावेळी विजय वैद्य, चंद्रशेखर वैद्य यांच्या परिवाराचे सदस्य आणि सर्वच थरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते. अजित पवार यांच्या समवेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य सुरु ठेवले. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने काम सुरु ठेवले होते आणि जव्हार चा विकास हाच एकमेव ध्यास घेतला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात जव्हार संस्थानच्या माजी आमदार काकी वैद्य यांचे ते नातू होते तर ज्येष्ठ समाजवादी नेते रवींद्र वैद्य यांचे चिरंजीव तसेच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर वैद्य यांचे ते पुतणे होत. त्यांच्या अकाली, आकस्मिक निधनामुळे जव्हार येथे शोककळा पसरली असून अजितदादांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनाने या भागातील राजकीय वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here