Home राजकीय केरळमध्ये काँग्रेस आघाडीचा विजय, डाव्यांचा अखेेरचा गडही कोसळला

केरळमध्ये काँग्रेस आघाडीचा विजय, डाव्यांचा अखेेरचा गडही कोसळला

10
0

केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीने बहुमतापेक्षाही अधिक जागा घेऊन मोठ्या संख्येसह सत्ता हस्तगत करुन मोठी मुसंडी मारली आहे.

काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीने केरळमध्ये ९७ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे. तर डाव्या पक्षाची आघाडी एलडीएफचा मोठा पराभव झाला आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एलडीएफ) पराभव होईल, असाही अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला होता.
डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ मध्ये एकहाती सत्ता गाजवली. त्रिपुरा राज्यात १९९३ ते २०१८ या काळात सत्ता स्थापन केली. तसेच केरळमध्ये यूडीएफ आणि एलडीएफ यांची आलटून पालटून सत्ता येत होती. २०२१ ची निवडणूक अपवाद ठरली. या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. केरळमधील डाव्यांची सत्ता जाणे म्हणजे आता देशभरात एकाही राज्यात त्यांचे सरकार नाही असे चित्र स्पष्ट झाली आहे.
१९७७ नंतर प्रथमच भारतात एकाही राज्यात डाव्यांची सत्ता नसणार आहे. २०१६ साली पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफचे सरकार केरळमध्ये स्थापन झाले होते. १९७७ नंतर देशात एकही कम्युनिस्ट मुख्यमंत्री नसणार आहे. यामुळे डाव्यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव कमी होईल, असे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here