भरणार अनोखे एक दिवसीय ५वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन!
साहित्य परिवार आणि नॅशनल लायब्ररी, वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वांद्रे येथे आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तसेच तुकाराम महाराजांचे वंशज मा. डॉ. सदानंद मोरे (संमेलनाध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील (उद्घाटक),
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि ग्रंथालीचे विश्वस्त तसेच अभियंता राजीव श्रीखंडे. (प्रमुख पाहुणे),
रेड स्वस्तिकचे रक्तदान अभियान महाराष्ट्रभर चालवणारे रिटायर्ड आई. जी. मा. टी. एस. भाल (विशेष मान्यवर), शुभंकरोति साहित्य परिवारच्या संस्थापिका तसेच अनेक संस्थांच्या सल्लागार, प्रशासिका व कार्यवाह सोनाली जगताप (स्वागताध्यक्ष),
मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. प्रतिभा सराफ (गझलरंग अध्यक्ष),
कथाकार व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत कविता लेखन प्रकाशित झालेल्या व नागपूरच्या कुसुमताई आंतरराष्ट्रीय प्रकाशनच्या प्रकाशिका डॉ. मंजुषा सावरकर (अभिवाचन अध्यक्ष), कुटुंब रंगलंय काव्यात या कार्यक्रमाद्वारे जगभरात सर्वांच्या कविता पोहोचवणारे काव्यदूत विसुभाऊ बापट (कवी संमेलनाध्यक्ष) खानदेशच्या ज्येष्ठ साहित्यिका व शुभंकरोति साहित्य परिवारच्या अध्यक्ष प्रा. सुमती पवार, समाजसेविका, ग्रामगीताचार्य, शुभंकरोति साहित्य परिवारच्या मुख्य प्रशासिका डॉ. माया यावलकर, तसेच वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचे कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक सर व कार्यवाह विद्याधर झारापकर सर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
इच्छुकांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




















