Home मुंबई भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर!

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर!

15
0

मुंबई: राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून ५ नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील ५ विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here