Home मुंबई *शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे हेच एसीबीच्या...

*शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे हेच एसीबीच्या जाळ्यात!*

7
0

*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले!*

*”घरात ४१९ तोळे सोने सापडूनही दीड दिवसात जामीन…*

शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या कारवाईत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे हेच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.

राजेंद्र अहिरे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली,या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना तब्बल ४१९ तोळे सोने, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत झाल्याची माहिती समोर आली आहे.

एसीबीच्या पथकाने केलेल्या तपासात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये सोन्याचे दागिने, स्थावर मालमत्तेची कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले दस्तऐवज जप्त करण्यात आले.

प्राथमिक चौकशीत शिक्षक भरती प्रक्रिया, शालेय मान्यता, तसेच इतर प्रशासकीय व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात अनेक व्यवहार हे मध्यस्थांमार्फत केल्याची शक्यता असून, काही अधिकारी व दलाल यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एसीबीकडून सध्या सखोल चौकशी सुरू असून, येत्या काळात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातील विविध स्तरांतून होत आहे.

४१९ तोळे सोने सापडते, कोट्यवधींची मालमत्ता उघड होते… आणि दीड दिवसात जामीन कसा?
ही न्यायव्यवस्थेची प्रक्रिया की सामान्य जनतेच्या विश्वासावर आघात?
शिक्षण क्षेत्र हे समाजाचा कणा मानले जाते. पण जर याच क्षेत्रात भ्रष्टाचार रुजत असेल आणि आरोपी सहज सुटत असतील, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार नाही का?
“कायद्याची भीती संपली, तर भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणारच!”
असे प्रश्न व शंका उपस्थित होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here