Home पुणे *हे शिव,फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही*

*हे शिव,फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही*

11
0

*राजकारण बाजूला ठेवून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे*

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खा. सुप्रिया सुळे*

पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले,महात्मा ज्योतिबा फुले हाच धागा पकडून महाराष्ट्र सरकारला हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी, महिला अत्याचार आणि मुलींच्या शिक्षणाासाठी घ्यावा.”असे सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

खा.सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की,”अंधश्रद्धा, महिला अत्याचार, हुंडाबळी यांसारख्या घटना वारंवार समोर येत आहेत, हे शिव,फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.”असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या.
खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”मुलींच्या शिक्षणाबाबत ‘असर’ च्या अहवालातून मिळणारी माहिती समाधानकारक नाही. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, सर्वांनी मिळून सामाजिक परिवर्तनासाठी काम करण्याची गरज आहे.” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
“अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांना धमक्या मिळत असताना, त्यांपैकी एकाही महिलेला तक्रार करण्याचा आत्मविश्वास समाज म्हणून आपण का देऊ शकलो नाही? एक यंत्रणा आणि व्यवस्था म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत का, याचा गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे.” असे खा.सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आणि युवती काँग्रेसने ठरवले आहे की, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना समोर येतील, त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना भेटून, भोंदू बाबांकडून होणाऱ्या महिलांच्या छळाविरोधात आवाज उठवला जाईल आणि तो थांबवण्यासाठी राज्यभर मोहिम राबवली जाईल.” असेही खा. सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,अजितदादांच्या दुर्घटनेबाबत रोहित सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र, त्यावर कारवाई का केली जात नाही? या दुर्घटनेमागील कारण काय ? या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, एवढीच आमची अपेक्षा आहे. अशी सुप्रियाताई सुळे यांनी मागणी केली आहे.

खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”पहलगाम येथील हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्या वेळी देशावर संकट आले किंवा राष्ट्रीय समस्या उद्भवल्या, तर आम्ही सरकार आणि देशासोबत ठामपणे उभे राहू ही भूमिका सर्वप्रथम5 आदरणीय शरद पवार साहेबांनी मांडली होती. या भूमिकेला काँग्रेसनेही पाठिंबा दिला,असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
यावर सविस्तर बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”आपल्या देशात भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू झाली होती. गेल्या बारा वर्षांमध्ये वॉशिंग मशीन तर चालूच आहे. पण यासाठी काही संस्थांचा वापर केला जातोय. भ्रष्टाचाराचे संस्थात्मककरण ही प्रवृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी आणि समाजासाठी अत्यंत घातक आहे.” असेही खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here