Home मुंबई *बारामती मतदारसंघातून काँग्रेस-रासप-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. आकाश विजयराव मोरेंचा उमेदवारी अर्ज...

*बारामती मतदारसंघातून काँग्रेस-रासप-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. आकाश विजयराव मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल*

19
0

मुंबई
बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड. आकाश विजयराव मोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण, कार्याध्यक्ष लहू अण्णा निवंगुने, बारामती शहर काँग्रेस अध्यक्ष अशोक इंगुले, सरचिटणीस राहुल वाबळे, कमलाकर सातव, गोविंद मिरगे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरधवल गाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोपणे, नगरसेवक अमोल सातकर, यांच्यासह काँग्रेस, रासप व वंचित आघाडीचे पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष निवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल.”अशी भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. त्यानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा केली होती. राष्ट्रीय समाज पक्षाने या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीही काँग्रेस सोबत आहे. काँग्रेस पक्षाने लढा लोकशाहीचा, मार्ग संविधानाचा या तत्वाने या पोटनिवडणुकीसाठी अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. ते व्यवसायाने वकील असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे हे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here