*कुंपण नीट तर,गिधाडं येणार नाहीत …महिला सुरक्षा आवश्यक!*
*कुंपणावरची गिधाडं जेव्हा शेतच उध्वस्त करतात तेव्हा ना ते कुंपण ना ते शेत काही करु शकत!*
*महिला मुली घरापासून बाहेरच्या समाजात, कामाच्या ठिकाणी सुरक्षित असाव्यात म्हणून कायद्यात तरतूद आहे. त्याचसोबत ही अंमलबजावणी करणारा गृहविभाग जर संवेदनशील व जबाबदार नसेल, त्यातील अधिकारी नको तिथे माती खात असतील तर कशी अपेक्षा करावी सुरक्षित वातावरणाची?*
*सीतेला लक्ष्मणाने एक मर्यादा रेषा अर्थात लक्ष्मण रेषा आखून दिली, मात्र *रावणाने सीतेला पळवून नेले. तो आला साधू रुपाने भिक्षा मागण्यासाठी, याचक साधू पाहून सीता ती रेषा ओलांडून बाहेर आली असावी…आणि रावणाचा हेतू साध्य झाला.*
*तर आज प्रकर्षाने आठवण होतेय ती धर्म नी साधुत्वाचा बुरखा घालून कधी पोलीस गणवेशात स्त्रीच्या इज्जतीवर घाला घालतात वा तसा प्रयत्न करतात.*
*गुन्हा कोणताही असो पोलीस कोठडीत पकडून आणलेले आरोपी सुरक्षित ठेवणे ही सद् रक्षणासाठी असणाऱ्या पोलीसांची असते…*
*आश्रमशाळा, सुधारगृह अशाही ठिकाणी मुली महिला सुरक्षित नसल्याचे दिसून आलेय.*
*काय करतील आपले कायदे, गुन्हा घडून गेल्यावर ?* *पीडितेच्या आयुष्यावर घाला घातला जातो. आरोपीला शिक्षा होईल तेव्हा होईल, त्या आधीच पीडितेने अत्याचार सहन केलेला असतो कोणताही गुन्हा नसताना.*
*म्हणूनच गुन्हा होण्याआधीच सुरक्षित वातावरण असणे सावधानता महत्त्वाची ठरते.*
*अकोल्यात अशीच विचित्र घटना होता होता थांबली.*
*शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमधील धक्कादायक प्रकाराने*महाराष्ट्र पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली एकीकडे अशोक खरातप्रकरणावरुन पोलिसांचा वेगाने तपास सुरू असून महिला लैंगिक*अत्याचार प्रकरणातील घटनांवर कडक कारवाई केली जात आहे. मात्र,*दुसरीकडे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन सेवा करणाऱ्या पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानेच महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनेच्या ठिकाणी दाखल झाले . *याप्रकरणी, आरोपी अटकेत असून न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, अटकेतील या आरोपीला प्यायला मिनरल वॉटर अन्*मोबाइलही वापरायला सहज मिळत असल्याने* *पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतो आहे.*
घडलं असं की,*
*पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीला, जिला संरक्षण मिळायला हवे होते, तिच्याच सन्मानावर गदा आणण्याचा प्रयत्न झाला.*
*सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवने कोठडीत असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, तसेच तुझ्या मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव, १० हजार देतो.” अशी निर्लज्जपणाची भाषाही त्याने वापरल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.*
*अकोला जिल्हा न्यायालयाने राजेश जाधवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अकोल्यातीलं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअप’मध्येचं ASI राजेश जाधव याने अटकेतील महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. जाधव याने अटकेतील महिलेला तुझ्या मुलीच वय किती? १० हजार रुपये देतो, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटलेत. एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला , यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ‘एएसआय’च्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केल्याचे नी झापल्याचेही दिसले.*
*आरोपी जाधव विरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून पोलिस खात्यातून त्याचे निलंबन झाले आहे. दरम्यान, कारागृहात रवानगी होण्यापूर्वी आरोपी जाधव कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसतोय. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून बोलण्यासाठी फोन उपलब्ध करून देण्यात आलय का? असा प्रश्न विचारला जातोय एएसआय राजेश जाधव याने पोलीस ठाण्यातच आर्थिक गुन्ह्यातील आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा* *धक्कादायक प्रकार १ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आला मुलीला पाठवण्याचे आमिष दाखवून आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करून अटक करण्यात आली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.*
*या घटनेमुळे पोलीस कोठडीतील महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेच.*
*पण असे पोलीस अधिकारी का वागतात? आणि केवळ निलंबनाने प्रश्न सुटणार का?*
*बाई गुन्हेगार असो की तक्रार करणारी, मदत मागायला आलेली असो ; ती सरकारच्या गृह विभागाच्या सुरक्षेखाली असते.*
*पण जर पोलीस ठाण्यातील असा प्रकार समोर आला असेल तर अनेक प्रश्न उभे रहातात.*
*बाई दिसली की ती फक्त लैंगिक वासनापुर्तीसाठी असते का?*
*अगदी चिंतेचा विषय, राजकारणातही महिला किती सुरक्षित असतात हा ? कोणी तरी शोषक असतात आणि अनेकदा पीडित महिला सोशित असतात.*
*कुठे बोलतील या महिला?*
*महिला आयोगावरचा तर विश्वास उडून गेलाय.*
*किती लिहावं तेवढं कमीच.*
*पण गृहविभागातील* *अधिकाऱ्यांवर एकदा कठोर नियमांचं सॅनिटायझर मारणे आवश्यक आहे.*
*पोलीस ठाण्यात कोठडीत सिसीटिव्हीवर लक्ष्य ठेवणारे वाॅच सेल असायला हवा.*
इतकं होऊनही या ना लायक पोलिसाला सर्व व्यवस्था* मिळत असेल तर याला काय म्हणावं? यावर कायमचा तोडगा महिला बालकल्याण व गृहविभागाकडून होणे आवश्यक आहे.*
*पण लक्षात कोण घेतो अशी वर्तमान स्थिती आहे. मात्र एक नक्की अशा वासनांधाना अशी कठोर शिक्षा देण्यात यावी की भविष्यात असे काळे कारनामे करण्याचे धाडस कोणी सद् रक्षणाय वाले करणार नाही.*
*एक घटना आठवली, आर आर पाटील गृहमंत्री असताना , पोलीस *विभागाकडून महिला सुरक्षा व तक्रारी घेण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले होते.*
*एका महिलेच्या केस संदर्भात एका पोलीस ठाण्यात गेले असता , तिथला पोलीस अधिकारी कुजकट स्वरात म्हणाला, ” आम्ही कुणावर हातही उचलू शकत नाही, पोलिसांनी मार खायचा .”*
*मी म्हटलं “असं का म्हणता? महिला तक्रार करायला आली तर मदत करा, *गुन्हेगारांवर हात उचलू नका असं थोडंच सांगितलंय?”*
*असे अर्थ आणि असे सदरक्षणाय काय कामाचे ,ज्यांची मानसिकता असंवेदनशील असेल?*
*पोलीस विभागाने वर्षाला एक परिक्षा पोलीसांची घ्यायला हवी..ती कोणती ते न सांगताच कळली असेल तर उत्तम!*
*कुंपण नीट असेल तर गिधाडं बसणार नाहीत ना घिरट्या घालणार?*
***


















