Home मुंबई *पुस्तक परीक्षण : विद्वत्तेचा महामेरू : देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे महान व्यक्तिमत्त्व...

*पुस्तक परीक्षण : विद्वत्तेचा महामेरू : देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे महान व्यक्तिमत्त्व डॉ . चिंतामणराव देशमुख !*

25
0

आपल्या देशात. कुशल, प्रगल्भ, कर्तव्यदक्ष आणि विदग्ध अर्थप्रशासकांची एक जणू परंपरा लाभलेली आहे.त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे डॉ.चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे होय.महाराष्ट्राच्या मातीत अनेक महान नवरत्ने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात जन्माला आली. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण आदींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले आहे. या मांदियाळीत आणखीन एका रत्नाचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे, कारण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात देशाच्या बँकिंग आणि अर्थव्यवस्थेला आकार देण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. डॉ चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे निष्णात अर्थतज्ज्ञ होते. त्यांची अर्थमंत्रीपदाची उज्ज्वल कारकीर्द, रिझर्व्ह बँकेत बँक गव्हर्नर म्हणून केलेली अतुलनीय कामगिरी याला तोड नाही. ते देशातील अनेक शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक संस्थांचे प्रणेते होते.तसेच अनेक संस्थांचे संस्थापक व उत्तम प्रशासक होते. कुशाग्र बुद्धिमत्ता, संस्कृत भूषण, नाविन्याचा ध्यास, वैज्ञानिक आणि तर्कसंगत स्वभाव यांचा अवकाश फार मोठा आहे.
डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे व्यक्तिमत्त्व इतके असाधारण आहे की, एका छोटेखानी पुस्तकात ते सामावण्यासारखे नाही. निष्णात अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्रीपदाची उज्ज्वल कारकीर्द, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून केलेली अतुलनीत कामगिरी याला तोड नाही. सी. डी अनेक भारतीय शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक संस्थांचे प्रणेते, संस्थापक, उत्तम प्रशासक, कुशाग्र बुद्धिमत्ता, संस्कृत भूषण, नाविन्याचा आणि प्रगतीचा ध्यास, वैज्ञानिक आणि तर्कसंगत स्वभाव यांचा अवकाश फार मोठा आहे.
महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञांनी, अर्थविषयक लिखाण करणाऱ्या लेखकांनी डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वावर मराठीतून दुर्दैवाने फारसे लिखाण केलेले नाही आणि पुस्तकेही लिहिलेली नाहीत.
चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या सी. डी.विषयी आजच्या पिढीला माहीत नाही. ज्यांच्या विद्वत्तेचा डंका जगभर वाजला त्या सी. डी. विषयी जुजबी माहितीसुद्धा आजच्या पिढीला नसावी हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, निष्णात अर्थतज्ज्ञ, संस्कृत – मराठी भाषाभूषण, देशातील अनेक शैक्षणिक व आर्थिक संस्थांचे संस्थापक,भारतीय धोरणकर्त्यांच्या मांदियाळीतील मेरुमणी आणि महाराष्ट्रभिमानी डॉ सी. डी.देशमुख यांची व महती आजच्या पिढीला कळायला हवी. डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे व्यक्तिमत्त्व इतके असाधारण आहे की, एका छोटेखानी पुस्तकात ते सामावण्यासारखे नाही. श्री योगेंद्र ठाकूर हे चळवळीतील लेखक -पत्रकार आहेत. ते अर्थविषयक अभ्यासक नाहीत तरी त्यांनी डॉ. सी. डी देशमुख यांच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे. डॉ. देशमुख यांच्या अष्टपैलू कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी पुस्तके मराठीत फारच थोडी, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी देखील नाहीत. तेव्हा महाराष्ट्रातील वर्तमान पिढीला आणि भविष्यातील पिढीला डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या बहुमोल योगदानाविषयी माहिती कळावी म्हणून श्री. योगेंद्र ठाकूर यांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने महाराष्ट्राचे शिल्पकार या मालिकेतील विद्वत्तेचा महामेरू हे छोटेखानी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

*पुस्तकाचे नाव : विद्वत्तेचा महामेरू*
*लेखक : योगेंद्र ठाकूर*
*प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. पृष्ठे १६०. मूल्य ७४ रुपये.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here