Home वर्धा / भंडारा / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली *भंडारा : ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी ‘महामोर्चा’*

*भंडारा : ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी ‘महामोर्चा’*

22
0

भंडारा जिल्ह्यातून आज ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल ओबीसी समाजाच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात’ समाजबांधवांसोबत सहभागी होऊन- २०२७ च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसेल, तर आमचा या जनगणनेत कोणत्याही परिस्थितीत सहभाग नसेल. सकल ओबीसी समाज जनगणनेवर बहिष्कार टाकेल असा कडक इशारा केंद्र आणि राज्य सरकारला या महामोर्चातून देण्यात आला.

हा मोर्चा आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या आरक्षणाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी पुकारलेला एल्गार आहे. जोपर्यंत २०२७ च्या जनगणनेत ओबीसींच्या हक्काचा स्वतंत्र कॉलम मिळत नाही, केंद्र सरकार ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करत नाही आणि ‘यूजीसी समता विधेयक २०२६’ तात्काळ लागू होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही. अठरापगड जातींच्या ओबीसी बांधवांनी आज जी एकजूट दाखवली आहे, तीच आपल्याला विजय मिळवून देईल. तुमच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी मी सदैव रस्त्यावर उतरून लढायला तयार आहे. जोपर्यंत आमचे हक्क मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही!

ओबीसी एकजुटीचा विजय असो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here