Home मुंबई *ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंची पेन्शन १५ हजार करा*- *पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आ. दरेकरांची...

*ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंची पेन्शन १५ हजार करा*- *पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आ. दरेकरांची शासनाला विनंती*

27
0

मुंबई – “राज्यातील महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी विजेत्या खेळाडूंना १५ हजार रुपयांची पेन्शन शासन देते. मात्र, ऑलिम्पिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना त्यापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. ऑलिम्पिक स्तरावर खेळलेले खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी यांच्या पेन्शनमध्ये समानता आणावी.” अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे बोलताना केली.

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलताना आ. दरेकर म्हणाले की, “ऑलिम्पिक प्रत्येक ४ वर्षानी आतंरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारातील खेळाडू वर्षानुवर्षे मेहनत करतात. अगोदर तालुका, नंतर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात. भारतातून लाखो खेळाडू प्रयत्न करत असतील तर फक्त काही हजारात खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळते. आणि त्यातल्या फक्त काही जणांना ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असते. ऑलिम्पिकचे पदक मिळालं तर देशाचा सन्मान वाढतो. पण पदक मिळालं नाही तरी स्पर्धेत भारतातर्फे खेळणं ही देखील तेवढ्याच सन्मानाची गोष्ट आहे. म्हणूनच प्रत्येक ऑलिम्पिक खेळाडूंना शासनामार्फत सन्मान दिला जातो. ऑलिम्पिक खेळाडूंना शासनाकडून १० हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. पुर्वी त्यांना ४ हजार रुपयांची पेन्शन मिळत होती. नंतर शासनाने त्यात वाढ केली. आपण राज्यातील महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी विजेत्यांना १५ हजार रुपयांची पेन्शन देतो. मात्र, ऑलिम्पिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना त्यापेक्षा कमी पेन्शन मिळतेय. त्यामुळे ऑलिम्पिक स्तरावर खेळलेले खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी यांच्या पेन्शनमध्ये समानता आणावी. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी व सभापतींनी याबाबत शासनास निवेदन करण्याच्या सूचना द्याव्यात.” अशी विनंती दरेकरांनी केली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here