Home मुंबई *टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*

*टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*

36
0

*भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद*
*- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

मुंबई, दि. ८ : टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.
या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.
*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here